

Weapon Found In Bag MLA Contact Office
Esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एका बॅगेत पिस्तुल आढळल्यानं खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी अज्ञाताने बॅग कार्यालयात ठेवली होती. कुणाची तरी विसरली असेल असे समजून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ती तशीच ठेवून दिली. पण सकाळी जेव्हा कुणीही बॅगेबाबत संपर्क केला नाही तेव्हा बॅग उघडून पाहिली असता त्यात पिस्तुल आढळून आले. यानंतर आमदार संजय केनेकर यांनी पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली.