२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar लहान मुलं प्री स्कूलच्या एका खोलीत असताना २० मिनिटं तिथे शिक्षक किंवा स्टाफपैकी कुणीच नव्हतं. २० मिनिटात २ वर्षांच्या चिमकुल्याला दुसऱ्या मुलाकडून बेदम मारहाण केली गेल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
2-Year-Old Allegedly Attacked During Unsupervised Period

2-Year-Old Allegedly Attacked During Unsupervised Period

Esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगरमधील प्ले स्कूलमध्ये चिमुकल्याला दुसऱ्या एका लहान मुलाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक बाब म्हणजे लहान मुलं प्री स्कूलच्या एका खोलीत असताना २० मिनिटं तिथे शिक्षक किंवा स्टाफपैकी कुणीच नव्हतं. २० मिनिटात २ वर्षांच्या चिमकुल्याला दुसऱ्या मुलाकडून बेदम मारहाण केली गेली. इतकंच नाही तर त्याला २० ते २५ ठिकाणी चावा घेण्यात आल्याचंही समोर आलंय. या प्रकाराने खळबळ उडाली असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com