Sand Smuggler : अवैध वाळूप्रकरणी पोलिसांची मध्यरात्री कारवाई; लोकेशन देणाऱ्या पंटरसह तिघे जण जेरबंद

वाळूच्या अवैध व्यवसायात पोलिस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांचे वाळूमाफियांना लोकेशन देणाऱ्या पंटरसह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तिघांना सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी जेरबंद केले.
Sand Smuggler
Sand Smuggler Sakal

छत्रपती संभाजीनगर : वाळूच्या अवैध व्यवसायात पोलिस आणि महसूलच्या अधिकाऱ्यांचे वाळूमाफियांना लोकेशन देणाऱ्या पंटरसह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तिघांना सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी जेरबंद केले.

१० एप्रिलला मध्यरात्री एकला एन-८ भागात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १० एप्रिलला रात्री शहरातील आझाद चौकातून पांढऱ्या रंगाच्या ‘हायवा’मध्ये चोरीची वाळू विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांना मिळाली.

यावरून त्यांनी डायल ११२ ला माहिती देत स्वतः घटनास्थळ गाठले. एन-८ भागातील जनता दूध डेअरीसमोर हा हायवा थांबविण्यात आला. हायवाचालकाची चौकशी केली असता, त्याने आपले नाव जमील खलील पठाण (वय २६, रा. सावंगी बायपास, हर्सूल) असे सांगत ही वाळू चोरीची असून कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले.

हायवाचालक जमीलकडे वाहनमालकाबाबत चौकशी केली असता, त्याने हे वाहन राहुल साहेबराव फटाकडे (वय २७, रा. पडेगाव) आणि राम पहेरकर यांचे असल्याचे सांगितले.

‘ब्रेझा’, ‘हायवा’सह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिडको पोलिसांनी या कारवाईत एक ‘हायवा’, एक ब्रेझा कार, ५ ब्रास वाळू असा ३१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अंमलदार अमोल अंभोरे यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अतुल येरमे. पीएसआय प्रमोद देवकाते, अमोल अंभोरे व सागर शिरसाठ यांनी केली.

Sand Smuggler
Chhatrapati Sambhajinagr : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच स्टेरॉइड औषधे; अनेक रुग्ण स्वतःचेच आरोग्य घालताहेत धोक्यात!

माहिती घेण्यासाठी आला अन् अडकला

पोलिसांची कारवाई सुरू असताना त्या ठिकाणी ब्रेझा कारमध्ये (एमएच २० ईई ९७१४) एक जण आला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव सुमित चांगदेव आढाव (वय २४, रा. चिनार गार्डन सोसायटी, पडेगाव) असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत सुमित हाच पोलिस आणि महसूल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या लोकेशनची टिप वाळूमाफियांना देत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी सुमित आढावसह वाहनमालक राहुल फटाकडे, चालक जमील पठाण यांना अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com