esakal | फेसबुकवर ओळख झाली, प्रेम जुळले, लग्नही जमले, अन्... आता गेला खडी फोडायला
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

लग्न मोडण्याची धमकी देत तरुणीवर चार महिने अत्याचार करणाऱ्यास अटक तरुणाला पोलिसांनी अटक केली. अमोल सुनिल चव्हाण (२५, रा. कडेठाण तांडा, ता. पैठण) असे त्या संशयिताचे नाव असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडपाध्ये यांनी दिले.

फेसबुकवर ओळख झाली, प्रेम जुळले, लग्नही जमले, अन्... आता गेला खडी फोडायला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: लग्न मोडण्याची धमकी देत तरुणीवर चार महिने अत्याचार करणाऱ्यास अटक तरुणाला पोलिसांनी अटक केली. अमोल सुनिल चव्हाण (२५, रा. कडेठाण तांडा, ता. पैठण) असे त्या संशयिताचे नाव असून त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडपाध्ये यांनी दिले.

चिकलठाणा, सावित्रीनगरातील एका २२ वर्षीय तरुणीची २०१४ मध्ये अमोल चव्हाणशी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०१९ मध्ये नातेवाईकांसमक्ष दोघांचे लग्न जमले.

हेही वाचाः शेतकरी संतापले, नुकसानभरपाई मिळेलही; पण ते होऊ नये याची हमी कोण घेणार?

त्यावेळी पाच लाख रुपये हुंडा देण्याचेही ठरले. लग्न जमल्यामुळे तरुणी व अमोल हे एकमेकांच्या आणखी जवळ आले. फोनवर बोलणे, घरी जाणे-येणेही वाढले. त्यानंतर २१ डिसेंबर २०१९ ते १३ मार्च २०२० दरम्यान अमोल चव्हाण याने लग्न संबंध तोडून टाकू अशी धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला.

तर अमोलचे आई-वडील आणि भावजी राठोड यांनी दहा लाख रुपये हुंड्याची मागणी करुन लग्न संबंध मोडण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी देत लग्न मोडले. प्रकरणात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी अमोल चव्हाणसह, वडील सुनील चव्हाण, आई व अमोलचा भावजी राम राठोड यांच्याविरुध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात  

पोलिस कोठडीत रवानगी
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीचा मोबाइल जप्त करणे आहे. आरोपींनी हुंड्याचे दोन लाख स्वीकारल्याचे पिडितेने सांगितले आहे, त्याअनुषंगाने तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अशोक सानेवणे यांनी न्यायायलाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

हेही वाचा- जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर... 

loading image