पोस्टमनने पोचवल्या राख्या, लाडक्या बहिणींची भावांना अनोखी भेट

ढाकेफळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) :  पोस्टाद्वारे आलेल्या राख्याचे पाकिट एका कुंटूबाला देताना पोस्टमन रऊफभाई शेख. (छायाचित्र ज्ञानेश्वर बोरूडे)
ढाकेफळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : पोस्टाद्वारे आलेल्या राख्याचे पाकिट एका कुंटूबाला देताना पोस्टमन रऊफभाई शेख. (छायाचित्र ज्ञानेश्वर बोरूडे)

लोहगाव (जि.औरंगाबाद) : शेती, शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक, राजकीय व प्रशासकीयसारख्या अनेक क्षेत्राच्या पटलावर कार्यरत राहून घर संसाराच्या रहाटगाड्याचा संघर्ष वेदना झेलत कर्तृत्व निर्माण करणाऱ्या बहिणींनी भावाच (Aurangabad) कायम ऋणानुबंध ठेवण्यासाठी प्रत्यक्षात दूरवरून येता आले नाही तरी भारतीय पोस्टाच्या माध्यमातून शेकडो बहिणींनी राखी पौर्णिमेला पाठवलेली रेशीम धाग्याची पाकिटे थेट भावाच्या घरी पोस्टमनने (Postman) रविवारी (ता.२२) पोच केली आहे. बहीण भावाच्या नात्याला रेशीम धाग्याच्या माध्यमातून संरक्षणाच वचन देणारा रक्षाबंधनदिनी (Raksha Bandan) अनेक भगिनींनी भाऊरायाला राखी बांधण्यासाठी सासरावरून माहेराची वाट धरली. परतु कामधंदा, नोकरी, व्यवसाय निमित्ताने राज्याची राजधानी, औद्योगिक वसाहतीसारख्या (Paithan) दुर अंतरावर संसाराचा गाडा चालवण्यासाठी बाहेरगावी राहणारे महिलांनी टपालाच्या माध्यमातून राख्याचे शेकडो पाकिटे पोस्टात टाकली.

ढाकेफळ (ता.पैठण, जि.औरंगाबाद) :  पोस्टाद्वारे आलेल्या राख्याचे पाकिट एका कुंटूबाला देताना पोस्टमन रऊफभाई शेख. (छायाचित्र ज्ञानेश्वर बोरूडे)
परराष्ट्र सेवेतील महाराष्ट्राचा हिरा,'वैभव'चा प्रेरणादायी प्रवास

परंतू रक्षाबंधन दिन ऐन रविवारी सुट्टीच्या दिवशीच आल्याने पोस्ट खात्याने यावर मात करत सुट्टी रद्द करून सर्व पोस्ट कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पैठण तालुक्यातील लोहगाव, बिडकीन, ढोरकीनसह सर्व पोस्ट कार्यालयामार्फत राख्याची आलेली पाकिटे पोस्टमनने घरपोच करण्याची लगबग सुरू होती. बिडकीन ते लोहगावच्या टपाल वाहक हिराबाई पवार यांनी सकाळी अकरा वाजता लोहगाव कार्यालयात पार्सल घेऊन येताच पोस्टमन मुजाहिद्दीन सय्यद, वाजेद सय्यद, ढाकेफळ येथील रऊफभाई शेख, मुलानीवाडगाव येथे वैभव शिरवत, शेवताचे विनोद गरड, यांनी शेकडो राख्याची पाकिटे पत्त्यावर पोच करित बहीण भावाच्या नात्याची रेश्मीगाठ घट्ट केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com