परराष्ट्र सेवेतील महाराष्ट्राचा हिरा,'वैभव'चा प्रेरणादायी प्रवास

भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६  पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून डॉ. वैभव तांदळे हे कार्यरत होते.
भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६ पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून डॉ. वैभव तांदळे हे कार्यरत होते.

बीड : राजधानी दिल्लीत एक आयएफएस (भारतीय परराष्ट्र सेवा) (Indian Foreign Services) अधिकारी कार्यरत आहे. बीडजवळील वंजारवाडी गावच्या डॉ. वैभव तांदळे (IFS Vaibhav Tandale) यांचा वाडी ते जपान ते दिल्ली हा प्रवास थक्क करणारा आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. बीडच्या तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Union Home Rajnath Singh) , गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah), विदेश मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S.Jaishankar) अशा दिग्गजांसोबत संवाद आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता येणे ही जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय पदवी (एमबीबीएस), बालरोग तज्ज्ञ (एमडी. पेड) ही पदव्युत्तर पदवी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या डॉ. वैभव तांदळे यांनी आयुष्यात कधीच शिकवणी लावली नाही हे विशेष. विशेष म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही मध्यमच. डॉ. तांदळे केवळ दिल्ली गाठून शांत नाहीत तर घार उडे आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी, अशी त्यांची जिल्ह्याबाबतची भावना आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधताना डाॅ.वैभव तांदळे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवाद साधताना डाॅ.वैभव तांदळे.
भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६  पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून डॉ. वैभव तांदळे हे कार्यरत होते.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढ्यात भूगर्भातून गूढ आवाज

जिल्ह्यासह देशभरातील नव्या पिढीला मार्गदर्शनासाठीही कायम पुढे असून त्यांच्या पत्नी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनिषा तांदळे देखील दिल्लीसारख्या मेट्रो सिटीतील सुख सुविधा सोडून ‘आपण मातीचे देणे लागतो’ या भावनेतून जिल्ह्यातच महिलांची आरोग्य सेवा करतात. डॉ. तांदळे केंद्रीय परराष्ट्र खात्यात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा तसा कायम दुष्काळी. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पाचवीला पुजलेला. याच दुष्काळी जिल्ह्यातील बीडजवळील वंजारवाडी त्यांच गाव. मात्र, याच वाडीच्या डॉ. वैभव तांदळे यांनी मजल - दरमजल करत दिल्ली गाठली. त्यांच्या वैद्यकीय तसेच वंजारवाडी ते जपान ते दिल्ली ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार दत्ता देशमुख यांनी संवाद साधल्यानंतर अनेक पैलू समोर आले. लहानपणापासून सामाजिक प्रश्नांची उकल करण्याची आवड असलेल्या वैभव तांदळे यांना माध्यमिक शिक्षणादरम्यान कुठली समस्या आली की ते सोडविण्याबाबत काय करता येईल, असे त्यांच्या डोक्यात द्वंद्व सुरू होई.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना डॉ. मनीषा तांदळे व त्यांचा मुलगा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना डॉ. मनीषा तांदळे व त्यांचा मुलगा.
भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६  पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून डॉ. वैभव तांदळे हे कार्यरत होते.
आईची पोटच्या गोळ्यासाठी पळापळा, पित्यानेच केले बाळाचे अपहरण

व्हायचं होत अभियंता; झाले डॉक्टर

करिअरच्या पहिल्या टप्प्यात सहाजिकच डॉक्टर - इंजिनिअर होण्याला प्राधान्य. डॉ. तांदळे यांना अभियंता व्हायचं होत. म्हणून दहावीत मेरिट आल्यानंतर त्यांनी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. १२ वी आणि वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी पूर्व परीक्षेतही चांगले गुण मिळवून त्यांची वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी (एमबीबीएस) प्रवेश निश्चित झाला. याच वेळी पुण्यातील प्रतिथयश शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात देखील त्यांची अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी निवड झाली. पण, घरच्यांना ते डॉक्टर व्हावे वाटत होते. म्हणून त्यांनीही शेवटी मेडिकल साईडच निवडली. वैद्यकीय पदवी पुण्यातून मिळविल्यानंतर मुंबईच्या प्रतिथयश केईएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून त्यांनी बालरोग तज्ज्ञ (एमडी. पेड) ही पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यांनी मुंबईच्या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक तसेच खासगी रुग्णालयांमध्येही त्यांनी वैद्यकीय सेवा केली.

भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६  पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून डॉ. वैभव तांदळे हे कार्यरत होते.
मनसे, भाजप जवळ येत असतील तर राज्याच्या हिताचे - प्रवीण दरेकर

लग्नानंतर आठच दिवसांनी युपीएससी तयारीला

डॉ. तांदळे यांना पाचवीपासूनच ‘आयएएस’ होण्याचं मनात घोळायच. वादविवाद स्पर्धांत ते सामाजिक बांधीलकी मुद्देसूद मांडत. समाजसेवेची आवड आणि समाजप्रती असलेली तळमळ हा त्यांचा स्थायीभाव गप्प बसू देत नसल्याने एमडी होऊनही ते समाधानी नव्हते. दरम्यान, ता. १३ जुलैला त्यांच लग्न झालं आणि आठच दिवसांनी ते ‘यूपीएससी’च्या तयारीसाठी दिल्लीला गेले. स्पर्धा परीक्षेची पंढरी अशी ओळख असलेल्या दिल्लीच्या मुखर्जीनगरातील मित्रांनी सहकार्याची कबूलीही दिली. मात्र, लग्नानंतर आठच दिवसांनी दिल्लीला आल्याबद्दलही दोषही दिले. अगदी ‘तु एमडी आहेस, चांगली प्रॅक्टिस आहे’, लग्नाला आठच दिवस झाल्याने युपीएससीऐवजी परत जाण्याचा मित्रत्वाचा सल्लाही त्यांना मित्रांनी दिला. पण त्यांच चित्त आयएएस होण्याकडेच खुणावत होतं. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी मिळवूनही युपीएससीत का? हाच प्रश्न मुलाखतीत त्यांना सर्व मुलाखतकारांनी विचारला. ‘समाजसेवेची आवड, आणि समाज उत्थानाची तळमळ’हे त्यांचे उत्तर पॅनलला भावले आणि त्यांची २०१२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातून भारतीय परराष्ट्र सेवेत (आयएफएस) निवड झाली.

भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६  पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून डॉ. वैभव तांदळे हे कार्यरत होते.
नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे वाढले प्रमाण

विविध देशांत, विविध राज्यांसोबत केले काम

परराष्ट्र सेवा (आयएफएस) विभागात उपसचिव म्हणून कार्यरत डॉ. वैभव तांदळे यांनी परराष्ट्र मंत्रालयाने हाती घेतलेले विविध प्रकल्प हाताळले आहेत. त्यांनी बहुपक्षीय आर्थिक संबंध विभाग, ब्रिक्सचे नोडल अधिकारी म्हणून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांसह (सुमारे ३५) वाणिज्य मंत्रालय, वित्त मंत्रालय, कृषी मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, इस्रो इतरांसह केले आहे.डब्ल्यूटीओ, डब्ल्यूएचओ, जी 20 इत्यादींसह इतर आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये प्रासंगिकतेच्या मुद्द्यांवर देखील काम केले आहे. बहुपक्षीय आर्थिक मुत्सद्देगिरीच्या मुद्द्यांवर इतरांनी ‘फिक्की’, ‘सी’, अशा विविध उद्योग संस्था आणि थिंक टँकमध्येही त्यांनी काम केले आहे. केंद्र सरकारकडून डॉ. वैभव तांदळे यांनी महाराष्ट्रासाठी वंदे भारत मिशन समन्वयक म्हणून देखील कामगिरी बजावली आहे.त्यांच्या मागील कार्यकाळात जुलै २०१६ - ते ऑगस्ट २०१९ पर्यंत भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६ पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून ते कार्यरत होते. ओसाकामध्ये व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून, डॉ. तांदळे ५० पेक्षा जास्त व्यावसायिक चर्चासत्रे, विविध राज्य सरकारांच्या (भारतातील सुमारे १७ राज्ये), बिझनेस चेंबर्स आणि इन्व्हेस्ट इंडिया, फिक्की, सीआयआय, अॅसोचेम यासारख्या संघटनांच्या सहभागामध्ये ते सहभागी होते. इतर. २०१९ मध्ये ओसाका येथे जी-२० शिखर परिषदेसाठी जपानच्या तीन पंतप्रधानांच्या भेटींमध्ये त्यांचा सहभाग होता.

भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६  पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून डॉ. वैभव तांदळे हे कार्यरत होते.
राम मंदिरासाठी मुख्यमंत्री पदाची खुर्ची लाथाडणारे कल्याण सिंह!

पत्नी डॉ. मनिषांचीही समाजाप्रती तळमळ

डॉ. वैभव तांदळे यांच्या पत्नी डॉ. मनिषा देखील स्त्री रोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी ओसाका (जपान) येथील वंधत्व निवारण हा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे. सध्या पती दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात आहेत. त्यांनाही दिल्लीसारख्या उच्चभ्रू व मेट्रोसिटीत नोकरी करता आली असती. सगळ्या सुखसोयींचा उपभोग घेता आला असता. मात्र, बीडसारख्या जिल्ह्यात स्त्रियांचे विविध आजार आणि स्त्री रोगतज्ज्ञांमध्ये स्त्रियांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे ज्या मातीत जन्म झाला तीचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी दिल्ली ऐवजी स्वत:च्या जिल्ह्यात सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्या जिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

भारताच्या कॉन्स्युलेट जनरल, ओसाका, जपान आणि २०१४-१६  पर्यंत भारतीय दूतावास, टोकिओ येथे उपमहावाणिज्यदूत म्हणून डॉ. वैभव तांदळे हे कार्यरत होते.
चाकरमान्यांना मोठं गिफ्ट; गणेशोत्सवाला धावणार राणेंची 'मोदी एक्स्प्रेस'

स्पर्धा परीक्षेसाठी तरुणांना डॉ. तांदळेंचा सल्ला

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी कोचिंगची, पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूरु, हैदराबादला गेलेच पाहिजे असे नाही. ध्येयनिश्चिती निश्चित असेल आणि तुम्हाला जिथे राहून अभ्यास करणे सोयीचे असेल तिथूनच अभ्यास करा. मात्र, तुम्हाला मार्गदर्शक चांगला मिळाला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला स्वत:च्या मनाचा कल ओळखता यावा. जर तुमच्या मनाने आयएएसच्या बाजूने कल दिला तर तुम्हाला आयएएस होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. स्वतःचा प्लॅन, स्वतःचं नियोजनाने तुमचा यशाचा मार्ग सुखकर होतो. आता विविध संस्थाही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पाठीशी खंबीर आहेत. यूपीएससीसाठी 10 वर्ष घालवू नका. पहिल्या दोन वर्षांत तुमचा निकाल तुम्हाला कळला पाहिजे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात पुस्तकांची जुळवाजुळव करा. खऱ्या अर्थाने परीक्षेची तयारी करणाऱ्या व नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मदत घ्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी कच्चे असल्याने न्यूनगंड असतो. मात्र, आता तर मराठीत मुलाखत देता येते. तुमची संवेदना जर लोकांचे प्रश्न समजून घेत असेल आणि ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर तुमचे पुस्तकी ज्ञान बाजूला ठेवावे लागते. महाविद्यालयीन शिक्षणापासून सुरुवात केली तर उत्तमच. लोकांना फक्त आयएएस आणि आयपीएस एवढेच माहीत आहे. पण यूपीएससीमध्ये भरपूर कॅडर असतात. आयएफएस झालेले उमेदवार समाजाला दिसतच नाही. डॉ. श्रीकर अंबुले यांनी आयएएससाठी निवड होऊनही आयएफएस निवडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com