Gangapur NewsSakal
छत्रपती संभाजीनगर
Chh. Sambhaji Nagar News : रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करत आंदोलन
Gangapur News : गंगापूर ते कायगाव रस्त्याच्या दुरवस्थेचा निषेध; झाडे लावून खड्ड्यांचे अनोखे पूजन, अपघातांनी जनता त्रस्त
गंगापूर : गंगापूर ते कायगाव रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक शिरसाट यांनी खड्ड्यांचे पूजन करून त्यात झाडे लावून अनोखे आंदोलन केले.