esakal | कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्याची तयारी पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Strike

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्याची तयारी पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी कमी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याचाच आधार घेत मनपातील ६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यासाठी मंगळवारी (ता. ३१) मनपा मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीला मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आणि डॉ. निता पाडळकर यांची उपस्थिती होती. (Aurangabad News)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने तिसरी लाट आली तर अजून कोव्हीड सेंटर सुरु करावे लागू शकतात. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे कंत्राट करार कायम राहू शकतात अशी शक्यता आहे. महापालिकेकडून कंत्राटी पद्धतीने एमबीबीएस, बीएमएमएस, बीएचएमएस डॉक्टर, परिचारीका, लॅब टेक्नीशियन, वार्ड बॉय आणि डाटा ऑपरेटर असे मिळूल ६०० जणांना कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले होते. यातील बहुतांश लोकांनी सहा महिन्यापेक्षा अधिक सेवा दिली आहे. तरीही मागील सहा महिन्यांपासून त्यांचे वेतन झालेले नाही.

हेही वाचा: आभाळ फाटलं : चाळीसगाव पाण्यात; कन्नड घाट दरडीखाली

त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महापालिकेत वेतनासाठी निवेदन दिले होते. चार दिवसांपूर्वी राज्याच्या आपत्कालीन निधीतून या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आठ कोटी रुपये मंजूर देखील झाल्याची माहीती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पर्यायी व्यवस्था महापालिकेने सुरु केली आहे. लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणीचे काम मनपा शिक्षकांकडे देण्यात येणार आहे. त्यासाठी काही जणांना प्रशिक्षण देखील देण्यात आल्याची माहीती सुत्रांनी दिली.

loading image
go to top