घृष्णेश्वर साखर कारखान्याविरोधात पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

कारखान्याने दिलेला शब्द न पाळल्यामुळे कारखान्याचे लक्ष वेधण्यासाठी छावा संघटनेने वेळोवेळी पुढाकार घेऊन अनेक वेळा निवेदने, आंदोलन केले
pune
punepune

ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव (औरंगाबाद): खुलताबाद येथील घृष्णेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे उसाचे वाढीव पेमेंट न देता शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करुन अखिल भारतीय छावा संघटनेने क्रांतीदिनी पुणे आयुक्त कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

यावेळी आदोलनानंतर संघटनेने साखर आयुक्त संचालक (अर्थ) श्री.मुकणे व सहसंचालक (अर्थ) राजेश सुरवसे यांना निवेदन दिले. यावेळी आशिष खंडेलवाल, बिट्टु पांचाळ, गौतम वाव्हळे, मच्छिंद्र चिंचोळे, प्रेम भुरे, संजय मरकड, अमोन आव्हाड, महेश शिंदे, गणेश आदमाने, परमेश्वर मरकड यांच्यासह ढाकेफळ, लोहगाव परिसरातील शेतकरी पदाधिकारी सहभागी होते.

pune
लातूरात का झाली पाच कनिष्ठ अभियंत्यांची उचलबांगडी?

घृष्णेश्वर कारखान्याने इतर कारखाने जो भाव देतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट देऊ असा शब्द दिला होता, मात्र कारखान्याने दिलेला शब्द न पाळल्यामुळे कारखान्याचे लक्ष वेधण्यासाठी छावा संघटनेने वेळोवेळी पुढाकार घेऊन अनेक वेळा निवेदने, आंदोलन केले. तरीही घृष्णेश्वर कारखाना व साखर प्रशासन यासंदर्भात कुठलीच दखल घेत नाही.तसेच साखर नियंत्रण आदेश १९५६ अधिनियमानुसार शेतकऱ्यांना एफ आर. पी. ची रक्कम ऊस तोडणीपासून किमान १४ दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे.या नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना वेठीस धरणारे साखर कारखाना विरोधात संघटनेने आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com