rushikesh jadhav
sakal
छत्रपती संभाजीनगर - जिद्द, शिस्त आणि अखंड परिश्रम यांचा संगम साधत मराठवाड्याच्या मातीतील सुपुत्राने देशसेवेच्या स्वप्नाला आकार दिला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण (तांडा) येथील ऋषीकेश प्रकाश जाधव याने भारतीय संरक्षण दलातील अधिकाऱ्यांची पायाभरणी करणाऱ्या खडकवासला (पुणे) येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) प्रवेश मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या एनडीए परीक्षेत आणि त्यानंतरच्या एसएसबी मुलाखतीत यश मिळवीत ऋषिकेषने मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.