esakal | जिल्हा नियोजनच्या निधीतून गरजूंना मोफत औषध द्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना संसर्गजन्य विषाणूचा फैलाव ही राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी संपूर्ण देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत गरजूंना मोफत धान्य पुरवठा करण्याबरोबरच गरजूंना मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने एक लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले केले आहे.

जिल्हा नियोजनच्या निधीतून गरजूंना मोफत औषध द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद. ता. २८ : हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड, अर्धांगवायू, अपस्मार, क्षयरोग, मानसिक विकार यांसारख्या तत्सम आजारासाठी रोज नियमित औषधे घ्यावी लागणाऱ्या गरजू रुग्णांना जिल्हा नियोजनाच्या निधीतून एक महिन्याची औषधे घरपोच देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले, कोरोना संसर्गजन्य विषाणूचा फैलाव ही राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी संपूर्ण देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत गरजूंना मोफत धान्य पुरवठा करण्याबरोबरच गरजूंना मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने एक लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले केले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

समाजात असंख्य लोकांना वेगवेगळ्या आजारामुळे नियमित औषधे घ्यावी लागतात. कोरोनामुळे आलेल्या या संकटाच्या काळात गरीब रुग्णांना औषधे घेण्यास अडचण येत असेल. हीच बाब लक्षात घेता हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड, अर्धांगवायू, अपस्मार, क्षयरोग, मानसिक विकार यासारख्या तत्सम आजारासाठी रोज नियमित औषधे घ्यावी लागणाऱ्या गरीब रुग्णांना जिल्हा नियोजनच्या निधीतून एक महिन्यांची औषधे घरपोच द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

खासगी रुग्णालये खुली ठेवा.

बहुतांश भागातील खासगी रुग्णालये बंद आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार कुठे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णालये ही अत्यावश्यक सेवा असून,  खासगी रुग्णालयाने खुली ठेवा.अशी मागणी करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image