esakal | पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांवर हल्ला, गावात दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांवर हल्ला, गावात दहशत

पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांवर हल्ला, गावात दहशत

sakal_logo
By
ईश्वर इंगळे

सोयगाव (जि.औरंगाबाद) : सोयगाववरून शासकीय व शेतीचे कामे आटोपून घराकडे जाताना पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल सात जणांवर हल्ले चढवून लचके तोडून जखमी केल्याची घटना सोयगाव-गलवाडा रस्त्यावर गलवाडा गावाजवळ घडली. यामुळे गावात दहशत पसरली होती. त्यापैकी गंभीर पाच जणांना तातडीने जळगावला हलविण्यात आले आहे. मात्र या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी कोणतीही यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली नव्हती. सोयगाव-गलवाडा रस्त्यावरून वाहनाने घराकडे जाताना पाच जणांना, तर शेतातून घरी जातांना दोन जणांना अशा सात जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने लक्ष केंद्रित करून जखमी केले आहे.rabies infected dog attack on seven people soygaon tahsil of aurangabad district

हेही वाचा: दानवे अन् कराडांची आगळी-वेगळी मैत्री, बैलगाडीतून प्रवास!

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आनंदा इंगळे (वय ५७), नंदाबाई औरंगे (वय ३५), लीलाधर इंगळे (वय ७१), सोनाली वाघ(वय २४, सर्व रा.गलवाडा) आणि अलीखा पठाण (वय ५०, रा.वेताळवाडी) या पाच जणांना गंभीर जखमी केले आहे. या घटनेत या पाच जणांना पायांना, हातांना आणि पोटावर हल्ला चढवून गंभीर केले. त्यांना तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर डॉ.केतन काळे, गोपाल देहाडे आदींचे पथकाने प्राथमिक उपचार करून या पाच जणांना जळगावला हलविण्यात आले आहेत.

हेही वाचा: Aurangabad Rain Updates : औरंगाबादेत जोरदार पाऊस

गलवाडा गावात दहशत

रस्त्यावरून जाणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवून गंभीर जखमी करणाऱ्या पिसाळलेला कुत्रा मोकाट फिरत असल्याने गावात दहशत पसरली आहे. या घटनेत दोन महिलांचा गंभीर जखमीमध्ये समावेश आहे.

मोकाट कुत्र्याला आवर घाला

सोयगाव-गलवाडा रस्त्यावरून वेताळवाडी, गलवाडा आणि सिल्लोड तालुक्याशी जोडणाऱ्या या रस्त्यावरून वर्दळ असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याला आवर घालण्याची मागणी होत आहे.

loading image