esakal | पावसामुळे शेतीची माती, ऐन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळे | Farmers In Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसरात  पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसामुळे शेतीची माती, ऐन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळे

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : शेंदूरवादा (ता.गंगापूर) (Gangapur) महसुली मंडळात अवघ्या हंगामात पावसाने कहर माजवला असल्याने पिकासह जमिनी खरडून गेल्या. जनावरांची मोठी हानी होत शेततळे विहिरी ढसाळल्या. बांध बंधारे फुटली पिकांनाही कोंबे फूटल्याने अवघ्या शेतीची माती झाली असून उद्ध्वस्त शेती अस्वस्थ शेतकरी असे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain In Aurangabad) वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. दिवाळीस बोनस असलेले मूग सोयाबीन, भुईमूग जागीच खुजले. एकरकमी पैसा मिळवून देणारा ऊस पाऊस वादळी वाऱ्याने सपाट झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी निसर्गाच्या कोपामुळे चांगलाच हतबल झाले. त्यामुळे ऐन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची (Farmers) दिवाळे निघाले असून आता पेरणीसाठी घेतलेले खासगी कर्ज उधार उसनवारी फेडण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना अखेर वाळूज औद्योगिक वसाहतीत कारखानदारांची उंबरठे झिजवत नाही तर ऊसतोड कामगार म्हणून हातात कोयता घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा: मंदिरे खुली केल्याबद्दल भाजपने औरंगाबादेत साजरा केला आनंदोत्सव

मागील वर्षी ही खरिपाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. पण तब्बल एक तपानंतर यंदा मृगाच्या पहिल्या आठवड्यात परिसरात पाऊस झाला. परिणामी शेतकरी सुखावले होते. मात्र पेरणी बी-बियाणे खरेदी करण्यात वेळेवर पीक कर्ज न मिळाल्याने अखेर सावकारांची उंबरठे झिजवत खरिपात कापूस लागवड करून सोयाबीन, मूग, बाजरी, मका व तूर आदी पिकांची पेरणी केली. पेरणी होताच पाऊस वेळेवर होत राहिला खरीप चांगले उत्पन्न देईल, या अशांनी रासायनिक खतांची शेकडा दराने रक्कम घेऊन जुळवा जुळव केली. तर काही शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवत पीक बहरात आणले. एकरी किमान सात ते आठ क्विंटल कापूस निघेल, असे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शेतकर्‍यांच्या आशेवर अतिवृष्टीने पाणी फेरले. वेचनीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या असून कौऱ्या काळ्याकुट्ट झाल्याने यापुढे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ग्रामीण भागातील 70 टक्के कुटुंब शेती करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात. दरम्यान यंदा नगदी पिके निसर्गाच्या प्रकोपामुळे पूर्णतः वाया गेली असून अतिवृष्टीमुळे कापूस पाण्यात गेला सोयाबीनला अंकुर फुटले परिणामी करण्यात आलेला खर्च पदरी पडणार नाही. पर्यायाने खरीप पेरणी घेतलेली खासगी कर्ज उधार उसनवारी कशी फिटणार यामुळे शेंदुरवादा, मांगेगाव, शिवपुर, नागापूर, सावखेडा, गुरुधानोरा, टेंभापुरी ढोरेगाव यासह परिसरातील शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली दबताना दिसत आहे. शासनाने तात्पुरती मदत न करता भरीव स्वरूपाची मदत करत शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी मागणी सरपंच ताराचंद दुबिले, सचिन विधाटे, विठ्ठल राऊत, भाऊ साळवे, संतोष खवले, रावसाहेब सुकासे,जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णा सुकासे, अनिल खवले, अमोल गावंडे, एकनाथ खंडागळे, अशोक निकम, कारभारी दुबिले, रावसाहेब टेके, सोयल चाऊस आदी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा: माहूर गडावर घटस्थापना, रेणुका मातेचे भाविकांनी घेतले दर्शन

वरिष्ठांच्या आदेशाने तालुक्यात सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शासनाकडून जी काही मदत प्राप्त होईल. ती तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे माझे प्रयत्न राहील.

- सतीश सोनी, तहसीलदार

loading image
go to top