esakal | माहूर गडावर घटस्थापना, रेणुका मातेचे भाविकांनी घेतले दर्शन | Navratri Ustav At Mahur Gad
sakal

बोलून बातमी शोधा

माहूर (जि.नांदेड) : माहूर गडावर रेणुकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.

माहूर गडावर घटस्थापना, रेणुका मातेचे भाविकांनी घेतले दर्शन

sakal_logo
By
साजीद खान

माहूर (जि.नांदेड) : साडेतीन पिठांपैकी एक पीठ असलेल्या रेणुका देवी मंदिर येथे गुरूवारी (ता. सात) शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करत नवरात्रोत्सवास (Navratri Ustav) प्रारंभ झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेला ‘उदे ग अंबे उदे’ च्या गजरात पहिल्या माळीला सकाळी सात वाजता अभिषेकांचे (Mahur Gad) सहस्त्र आवर्तन मुख्य देवता रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने सुरवात झाली. रेणुकामातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर, श्री परशुराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात धान्य टाकून कुंडावर मातीची कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोताल पाच उसाचे धांडे उभारुन (Shri Renuka Mata, Mahur) आणि त्या अधारे कलशावर पुष्पहार पहिली माळ चढवून (Nanded) सकाळी घटस्थापना करण्यात आली. संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एन. गौतम, सहायक जिल्हाधिकारी तथा पदसिध्द सचिव किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते कुमारीका पूजन करण्यात आले.

हेही वाचा: तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात उत्साहात घटस्थापना

पुजारी भवानीदास भोपी, चंद्रकांत भोपी, संजय काण्णव यांच्या हस्ते सिंगार, अलंकार करून पिवळ्या रंगाची पैठणी महावस्त्र परिधान करण्यात आले. साडेअकरा वाजता श्री. गौतम आणि किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्या नंतर छबिना मिरवणूक काढून परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती पूजन करण्यात आले. प्रतिपदेपासुन दशमीपर्यंत मंदीरात अखंड देवीसमोर नंदादीप तेवत ठेऊन दरोरोज पायास म्हणजे दही भात, पुरणपोळीचा नेवैद्य, आरती करून माहूरगडावर नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला. पोलीस विभागाने बंदोबस्त तैनात केल्याने कोविड नियमांची अंमलबजावणी करत भाविक दर्शनाचा लाभ घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ऑनलाइन व ऑफलाइन पासशिवाय दर्शन मिळणार नसल्याने भाविकांची गर्दी ही नियंत्रणात होती.

हेही वाचा: आघाडी सरकारला सुबुद्धी देवो,राधाकृष्ण विखेंची राज्य सरकारवर टीका

loading image
go to top