औरंगाबाद पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, रावसाहेब दानवेंची गर्जना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - जनआशीर्वाद यात्रेत बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. (छायाचित्र - गणेश पिटेकर)

औरंगाबाद पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, रावसाहेब दानवेंची गर्जना

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेवर (Aurangabad Municipal Corporation) भाजपचा झेंडा फडकवू, अशी गर्जना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Of State For Railway Raosaheb Danve) यांनी केली आहे. येत्या काळात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्याअनुषंगाने दानवे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचा यावेळी सांगितले. आज शुक्रवारी (ता.२०) भाजपचे जनआशीर्वाद यात्रेचे आगमन शहरात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वित्तीय राज्यमंत्री यांचे भाजपतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पक्ष शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. श्री.दानवे म्हणाले, की पंतप्रधान मोदींमुळे देशात कोरोना लस लवकर आली. गरिबांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य मिळणार आहे.

हेही वाचा: चेंडू-चेंडू खेळण्याचे राजकारण आता बंद करा, संभाजीराजेंचा इशारा

या प्रसंगी त्यांची शिस्त पाहायला मिळाली. व्यासपीठावर झालेली गर्दी त्यांनी कमी करायला लावली. नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भागवत कराड तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Raosaheb Danve Said Upcoming Aurangabad Municipal Corporation Election Bjp Will Win

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raosaheb Danve