Rashid Mamu
sakal
छत्रपती संभाजीनगर
Sambhajinagar Election Result : निवडणुकीत टीकेचे धनी ठरलेल्या रशीद ‘मामूं’नी राखली सेनेची इभ्रत!
शिवसेना यूबीटी पक्षाने माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ ‘मामू’ यांना प्रवेश अन् उमेदवारी दिल्यानंतर राज्यभरात गहजब उडाला होता.
छत्रपती संभाजीनगर - शिवसेना यूबीटी पक्षाने माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ ‘मामू’ यांना प्रवेश अन् उमेदवारी दिल्यानंतर राज्यभरात गहजब उडाला होता. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता ‘मामू पक्ष’ झाला आहे, अशी टीकेची झोड अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते शिंदेंच्या शिवसेनेच्या गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी उठवली होती. पण, याच रशीद मामू यांनी प्रभाग ४ (ब) मध्ये विजय मिळवत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची इभ्रत राखली. पक्षाने ज्या सहा जागा जिंकल्या त्यामध्ये मामूंचाही समावेश आहे.
