Sambhaji Nagar News : जिल्हा परिषद शाळांत पालकांची ‘रस्सीखेच’

जिल्ह्यात १५ ते २९ डिसेंबरदरम्यान स्पर्धा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमsakal

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळा, प्रशासन आणि पालकांमध्ये समन्वय निर्माण व्हावा, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांसाठी १५ ते २९ डिसेंबरदरम्यान रस्सीखेचसह विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. पालक व शाळेतील आंतरक्रिया वाढून त्याचा वापर शैक्षणिक सुविधांसोबतच गुणवत्ता वाढीसाठी व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

ग्रामीण भागातील अनेक पालक व जिल्हा परिषद शाळा या दोघांमध्ये समन्वयाचा अभाव असतो. त्यामुळे शेतकरी, मजूर असलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षण व क्रीडा स्पर्धेचे महत्त्व कळत नाही. आपल्या पाल्याला क्रीडा स्पर्धेचे महत्त्व कळावे, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या फक्त आईवडिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धेचे नियोजन केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
Sambhaji Nagar : कर्करोग रुग्णालयात दुकान

या स्पर्धा शाळा, केंद्र, बीट व तालुकास्तरावर घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे नियोजन व पंचाची भूमिका शाळास्तरावर शिक्षक, केंद्रस्तरावर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, बीटस्तरावर विस्ताराधिकारी; तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक तेथे मैदाने तयार करणे. विजयी पालकांची यादी केंद्रीय मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश त्या-त्या शाळा प्रमुखाला शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिल्या आहेत.

क्रीडा प्रकार

- पुरुषांसाठी : कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल, शर्यत, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, रस्सीखेच

महिलांसाठी ः कबड्डी, खो-खो, लंगडी, शंभर मिटर धावणे, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, लंगोरी, दोरी उडी (तीन मिनिट), रस्सीखेच

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
Sambhaji Nagar News : थकीत कराचे कारण...थांबले मोफत दळण

जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या आई-वडिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धेचे नियोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी शाळास्तरापासून ते तालुकास्तरावरील सर्व क्रीडा स्पर्धांचे संनियंत्रण स्वतः लक्ष देऊन करावे. त्यामध्ये जाणीवपूर्वक प्रथमोपचार साहित्य व इतर आनुषंगिक साहित्य उपलब्ध ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या स्पर्धेच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या इतर विभागाची आवश्यक ती मदत घ्यावी, असा सूचना दिल्या आहेत.

- जयश्री चव्हाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com