महाराष्ट्रानंतर पेरूही गिरवणार इंग्रजीचे धडे!

शालेय शिक्षणात ‘रीड टू मी’ ॲपचा करणार कौशल्यपूर्ण अभ्यासासाठी वापर
Read to Me app
Read to Me app

औरंगाबाद : राज्यात ‘रिड टू मी’ हे ॲप यशस्वी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयात संभाषण, अध्ययन कौशल्य विकसित होत आहे. ‘रीड टू मी’ हे इंग्रजी भाषेचे ॲप वापरात देशात महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे. याची दखल दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशाने घेतली आहे. आता हा उपक्रम पेरूतही राबविला जाणार असल्याची माहिती ‘डायट’चे प्राचार्य कलिमोद्दीश शेख यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयाचे अध्ययन व संभाषण कौशल्य विकसित व्हावे, यासाठी राज्य शासन व इंग्लिश हेल्पर नवी दिल्ली यांच्या संयुक्त करारातून हे ॲप विकसित केलेले आहे. अॅपच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी विषयाची राज्य मंडळ व सीबीएसईची पाठ्यपुस्तके वाचन स्वरूपात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाचे अध्ययन प्रभावी करून मुलांची इंग्रजी विषयाची भीती कमी करण्यात आली आहे. इंग्रजीत संभाषण करण्यासाठी विद्यार्थीसाठी ‘रीड टू मी’ स्टुडंट एडिशन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर वर्गात वापरून शिक्षक इंग्रजी शिकवू शकतात.

वाचनाचा वेग, अनुवाद, चित्र शब्दकोश, इंग्रजी शब्दकोश, उच्चार आणि शब्दलेखन साधन यासारख्या वैशिष्ट्यांमुळे अभ्यासक्रम समाविष्ट करताना शिक्षकांचे अध्यापन प्रभावी करण्यासाठी उपयोग होत आहे. महाराष्ट्रातील २१ हजार १८६ शाळांनी आत्तापर्यंत हे ॲप डाऊनलोड केले आहेत. ९० हजारांपेक्षा जास्त शिक्षक व ४० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या ॲपचा वापर करतात. आता पेरूतील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाचे कौशल्य विकसित करण्यासाठी `रीड टू मी’ या ॲपचा वापर केला जाणार आहे.

भारतातील सर्व राज्यांत ‘रीड टू मी’ ॲप चा वापर केला जात आहे. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यासह श्रीलंका, आफ्रिका देशात देखील त्या-त्या भाषेनुसार ॲप वापरासाठी दिले आहे. त्यानंतर आता पेरूच्या सरकारशी देखील करार झाला आहे. लवकरच महाराष्ट्रात इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, इतिहास, भूगोल विषयदेखील इंग्रजी विषयातून मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

-संजय गुप्ता, सीईओ, रीड टू मी ॲप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com