esakal | कोरोनामुळे कर्जदारांची मोठी मागणी, कर्जाचे मासिक हफ्ते पुढे ढकला
sakal

बोलून बातमी शोधा

photo

-बँकांचे कर्ज भरण्यावर सवलत द्या 
-ईएमआयला सहा महिन्याची मुदत द्या

कोरोनामुळे कर्जदारांची मोठी मागणी, कर्जाचे मासिक हफ्ते पुढे ढकला

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : करोना व्हायरसच्या अनुशंगाने टुरिस्ट टॅक्सीच्या व्यवसायावर भयंकर संकट आलेले आहे. टुरिस्ट टॅक्सीचे जवळपास सर्वच वाहने कर्जाऊ आहेत. सध्या शंभर टक्के व्यावसाय ठप्प झालेला असल्याने व्यावसाईक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे बँकांमधुन कपात होणारे ईएमआय रद्द करुन किमान सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी औरंगाबाद टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे.
 
वाहनांवर उदरनिर्वाह

व्यावसाय म्हणुन चालणाऱ्या बहुतांश वाहनांवर कर्ज आहेत. त्यांचे ईएमआय, ईन्शुरनस, आरटीओ टँक्स भरणा हे त्या व्यवसायावरच अवलंबुन आहे. औरंगाबाद शहर हे पर्यटनाची राजधानी असल्यामुळे येथे बऱ्याच सुशिक्षित बेरोजगारांनी गाड्या घेवुन ते स्वतः चालवतात व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावरच अवलंबुन आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

व्यावसाय शंभर टक्के बंद 

कोरोना व्हायरस मुळे व्यवसाय हा व्यावसाय शंभर टक्के बंद असल्यामुळे बँकेचे ईएमआय, ईन्शुरनस, आरटीओ टँक्स भरणे अवघड झाले आहे. वाहन चालकांनाही घरातुन वेतन द्यावे लागनार आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे कर्ज घेणाऱ्यांना अन्य लोकांचे बँकांचे वाहन कर्ज, गृहकर्ज, पर्सनल लोन किंवा इतर प्रकारचे कर्ज वेळेवर भरण्यासाठी व्यवस्था करावी लागणार आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दंडात्मक कारवाईची भिती

कर्जाचा हप्ता चुकला तर दंडात्मक कारवाई होते, सीबील स्कोअर वरही परिणाम होतो. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेवर कर्ज भारताना अडचण निर्माण झाली आहे. अनेकांना ऑनलाइन व्यवहार करता येत नाही. सध्या संचारबंदी ची परिस्थिती असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहे. बाहेर पडल्यानंतर पोलिसांचे फटके सहन करावे लागतील या भीतीने कोणीही बाहेर पडत नाही. त्यामुळेच कर्जाचे हप्ते तसेच आरटीओचे करआ व अन्य विभागाचा भरणा करण्यासाठी सहा महिन्यापर्यंची सवलत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 


वाहनांचे ईएमआय व अन्य प्रकारचे टँक्स भरण्याच्या बाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. ईएमआय भरताना दंड लावु नये तसेच कमित कमी सहा महिन्याचे रिलॅक्सेशन द्यावे, जे शासकीय टॅक्स आहेत ते माफ करावे. 
अनिल कहाळे 
(सचिव : औरंगाबाद टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन)