Nitin Banugade
Nitin Banugadesakal

Sambhaji Nagar : ‘रिलायबल’ आणि ‘सकाळ’तर्फे शनिवारी गुणवंतांचा सत्कार

यशोत्सव गुणगौरव यशवंतांचा : बानगुडे पाटील यांचे व्याख्यान

Sambhaji Nagar - आतापर्यंत अकराशेपेक्षा जास्त अधिकारी घडविणारे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र आणि सकाळ माध्यम समूहातर्फे शनिवारी (ता.१५) दुपारी ३ वाजता संत एकनाथ रंगमंदिरात रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ९० पेक्षा जास्त पीएसआय, एसटीआय आणि एएसओ झालेल्या यशवंतांचा गुणगौरव केला जाणार आहे. यावेळी इतिहास अभ्यासक, लेखक व प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.

Nitin Banugade
Chhatrapati Sambhaji Nagar : कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; सिल्लोडमधील नागरिकांचे क्रांती चौकात आंदोलन

यावेळी रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक धनंजय आकात, उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, राष्ट्रीय प्रशिक्षण भारत सरकार तथा माजी संचालक मदता, पैठणचे संदीप काळे, ‘सकाळ’चे निवासी संपादक दयानंद माने यांची प्रमुख उपस्थिती राहील. नुकताच पीएसआय पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यात रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे ९० पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात रिलायबल परीक्षा केंद्राने महाराष्ट्राच्या निकालात तब्बल आठ टक्के वाटा उचलला आहे.

Nitin Banugade
Sambhaji Nagar : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

अशा गुणवंतांचा रिलायबलतर्फे सत्कार केला जाणार आहे. यावेळी शंभुराजे व वंदे मातरम या महानाट्याचे लेखक, निर्माते, मागील २० वर्षांत देशात व विदेशात साडेपाच हजारपेक्षा जास्त व्याख्याने दिलेले प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे विशेष व्याख्यान होईल.

Nitin Banugade
Sambhaji Nagar : जि.प.च्या शिक्षण विभागात भरली उर्दू शाळा; शाळेत शिक्षक नसल्याने पालक आक्रमक

प्रा. बानुगडे पाटील यांचे काही जनातलं काही मनातलं, यशाचा पासवर्ड, यश मुद्रा, विचारमुद्रा हे पुस्तके प्रकाशित आहे. तर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील रौद्र हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. विविध क्षेत्रांतील सामाजिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे हे त्यांच्या मेहनतीबरोबर त्यांचे माता- पिता, गुरुजन, मित्रपरिवार या सर्वांचेच यश असते. अशा प्रसंगी या सर्वांना प्रेरणा देणे आणि त्यांचे कौतुक करणे यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करत आहोत. याशिवाय भविष्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन मिळावे, प्रेरणा मिळावी यासाठी हा सत्कार सोहळा आहे.

- धनंजय आकात, संचालक, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com