लसीकरण वाढीसाठी धर्मगुरूंनी घ्यावा पुढाकार | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण
धर्मगुरूंनी घ्यावा लसीकरण वाढीसाठी पुढाकार

औरंगाबाद : लसीकरण वाढीसाठी धर्मगुरूंनी घ्यावा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाला रोखायचे असेल तर सर्वांनी लक घेणे आवश्‍यक आहे. यासाठी सर्व समाजातील धार्मिक नेत्यांनी, प्रमुखांनी, धर्मगुरूंनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे. लसीकरण वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.१६) जिल्ह्यातील धर्मगुरूंची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस वाजेद कादरी, युसूफ अन्सारी, इक्बाल अहमद अन्सारी, फादर स्टिफन अलमेडा, श्री.हाफिज, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. लड्डा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, डॉ.वाघ आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: औरंगाबाद : कन्नड घाट जड वाहतुकीसाठी बंद

यावेळी धर्मगुरूंनी शाळेतील पाल्य, त्यांचे पालक यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. जनजागृती, शिबिरे, कॉर्नर बैठका, प्रेरणादायी व्याख्याने, दवाखान्याची वेळ निश्चित करणे, फिरते वाहनाद्वारे जनजागरण, वकील, डॉक्टर, स्वयंसेवी संस्था, मंगल कार्यालये आदींनी लसीकरणासाठी आग्रही असणे आवश्यक असल्याच्या प्रशासनाला सूचना केल्या. तसेच सर्वांकडून प्रशासनाला मदत करण्यात येईल, असेही सांगितले. लासूर, सिद्धनाथ वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, वडगाव, गेवराई तांडा, नायगाव, बकापूर, पीरवाडी, बनगाव, ओव्हर, माहुली, रावळसपुरा, मिकापूर, काद्राबाद, वरुडकाजी, अंजनडोह या गावात लसीकरण कमी झाल्याने या ठिकाणीही नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

loading image
go to top