
Remdesivir चोरी प्रकरण: अखेर भांडार प्रमुखांसह चौघांवर गुन्हे
औरंगाबाद: रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार होत असून चढ्या दराने विक्रीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. महापालिकेच्या भांडार विभागातून तब्बल ४६ रेमडीसिव्हिर इंजेक्शन चोरीला गेल्याचे असेच प्रकरण समोर आले. या प्रकरणात अखेर महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत संशयितांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
औषध निर्माण अधिकारी तथा भांडारप्रमुख विष्णु दगडू रगडे, सहायक औषध निर्माण अधिकारी (कंत्राटी) प्रणाली कोल्हे या दोघांसह अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यात २० ते २३ एप्रिल दरम्यान हा प्रकार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण राठोडकर (५२) हे महापालिकेत औषधी भांडार नियंत्रक पदावर आहेत.
हेही वाचा: लसीचा तुटवडा, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण तूर्तास बंद
महापालिकेच्या जुना मोंढ्यात औषधी भांडार आहे. भांडार कक्षातून काही औषधींचा पुरवठा मेल्ट्रॉन कोविड सेंटरला करण्यात आला होता. या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी संतोष कापूरे आणि पुजा कुलकर्णी यांनी भंडार गृहातून आलेल्या औषधांची तपासणी केली. या तपासणीत एक बॉक्समध्ये रेमडीसिव्हीरचे ४८ इंजेक्शन ऐवजी एमपीएसचे ७५ इंजेक्शन आढळून आले.
हेही वाचा: विद्यापीठाच्या पदवी परीक्षेस आजपासून सुरवात
या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. मात्र त्यांच्याकडून अपेक्षीत उत्तरे मिळाली नाहीत. या प्रकरणी बॉक्समध्ये रेमडीसिव्हिरच्या ४८ इंजेक्शनच्या ऐवजी ७५ वेगळी इंजेक्शन टाकून संबंधितांनी अपहार करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते करित आहेत.
Web Title: Remdesivir Theft Case Crime Against Four Including The Head Of The
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..