छत्रपती संभाजीनगर : प्रभाग-२ मधील भवानीनगरातील एक, दोन, तीन गल्ल्यांमध्ये नळाला ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे गॅस्ट्रो, काविळीचा धोका वाढला आहे. .यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनदेखील महापालिकेचा पुरवठा विभाग दुर्लक्ष करत असून, एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे..भवानीनगर गल्ली क्रमांक एक, दोन, तीनमध्ये तब्बल आठ दिवसाला नळाला पाणी येते. नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या भागात जलवाहिनी टाकून नळकनेक्शन दिले. असे असताना नळाला ड्रेनेजमिश्रित पाणी कसे येत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला..Chh. Sambhaji Nagar News : महापालिका विद्यार्थिनीने दिल्लीत रोबोटिक्स प्रकल्प सादर केला.आठ दिवसाला तेही ड्रेनेजमिश्रित पाणी नळाला येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. प्रभाग दोनचे सहायक आयुक्त, पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना यासंदर्भात वारंवार निवेदन देण्यात आले. प्रशासकांची भेट घेऊन कैफियत मांडली. मात्र, त्यानंतरही प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे नागरिक गॅस्ट्रो, काविळीचा धोका वाढला आहे..प्रशासनाने ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी आनंद परदेशी, रेखा काबरा, मंगल कनसे, मोहिनी परदेशी, रूपाली दसमुखे, दिनेश कावळे, सुप्रिया चव्हाण, शांताबाई जैस्वाल, शीतल सर्जे, सचिन गायकवाड, अश्विनी अग्रवाल, ताराबाई जैस्वाल, अनिता जैस्वाल, राधा कस्तुरे, सपना भंडारी, घनश्याम पाखरे, संजय टोंगळकर यांनी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.