औरंगाबाद शहरातील रिक्षा इलेक्ट्रिक करण्याचा संकल्प

डबल डेकर स्मार्ट शहर बस घेण्यासोबतच रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये परिवर्तन व इ-सायकलला चालना देण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा प्रयत्न राहील.
imtiaz jaleel
imtiaz jaleelsakal
Summary

डबल डेकर स्मार्ट शहर बस घेण्यासोबतच रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये परिवर्तन व इ-सायकलला चालना देण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा प्रयत्न राहील.

औरंगाबाद - डबल डेकर स्मार्ट शहर (Smart City) बस घेण्यासोबतच रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये (Electric Rickshaw) परिवर्तन व इ-सायकलला (E-Cycle) चालना देण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा प्रयत्न राहील, असे महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय (Aastikkumar Pandey) यांनी सोमवारी (ता. २१) सांगितले.

औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात पार पाडली. यावेळी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. श्री. पांडेय यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यात पूर्ण झालेली कामे, सुरू असलेली कामे, भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली.

imtiaz jaleel
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकहाती सत्ता; आघाडीचा महाविजय,भाजपचा पराभव

मास्टर सिस्टम इंटीग्रेटर, ई गव्हर्नर्स, जीआयएस सर्व्हेक्षण, कौशल्य विकास प्रकल्प, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व सौंदर्यिकरण, पादचारी मार्गासह सायकल ट्रॅक, स्ट्रीट फॉर पिपल, स्मार्ट सिग्नल, स्मार्ट बस याची माहिती श्री. पांडेय यांनी दिली. खासदार इम्तियाज जलील व माजी महापौर नंदकुमार घोडेले, काँग्रेसचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप, नाथव्हॅलीचे प्राचार्य रणजीत दास, आर्किटेक्ट हारेस सिद्दीकी, शहर अभियंता सखाराम पानझडे व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.

सर्व सिग्नलचे काम करा

खासदार जलील यांनी शहरातील सर्वच वाहतूक सिग्नलची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करावे, अशी सूचना केली. त्यावर सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात एक बैठक घेतली जाणार आहे, असे श्री. पानझडे यांनी सांगितले. श्री. घोडेले यांनी स्मार्ट स्कूल व स्मार्ट हेल्थ अंतर्गत प्रस्तावित कामाचे कौतुक केले व स्मार्ट भाजी मार्केट प्रकल्पाचा प्रस्ताव दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com