

Police officials begin investigation after retired forest officer’s kidnapping case in Sambhajinagar.
Sakal
छत्रपती संभाजीनगर: बीड बायपास परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन वादातून निवृत्त सहायक वन संरक्षक अधिकारी एकनाथ कान्हेरे (वय ६८, रा. गारखेडा) यांचे रविवारी (ता. १५) भरदिवसा अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली. अनोळखी चौघांनी त्यांना मारहाण करत अंगावर अनोळखी रसायन टाकले, तसेच जमिनीवरील दावा सोडण्याची धमकी देत त्यांच्या हातातील अंगठी आणि रोख रक्कम लुटली. सुमारे सात तासांच्या या थरारक प्रकारानंतर त्यांना बदनापूर परिसरात सोडून आरोपी पसार झाले.