sambhaji nagar
sambhaji nagar sakal

Sambhaji Nagar News : आपण दुचाकी चालवत असाल तर चिलटांपासून सावधान ; संभाजीनगर शहर आणि परिसरात मागील आठवडाभरापासून चिलटांचा त्रास वाढला

सध्या चिलटांसाठी पोषक हवामान आहे. सकाळच्या वेळेस येणारे धुके, दुपारी असणारे ऊन आणि रात्रीच्या वेळेस थंडी यामुळे चिलटांचे प्रजनन वाढले आहे.

छत्रपती संभाजीनगर : आपण दुचाकी चालवत असाल, पायी जात असला तर चिलटांपासून सावधान! शहर आणि परिसरात मागील आठवडाभरापासून चिलटांचा त्रास वाढला आहे. दुचाकी चालवताना कित्येकांच्या डोळ्यांत चिलटे जात असल्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तसेच यातून लक्ष विचलित होऊन अपघाताला निमंत्रण मिळू शकते.

सध्या चिलटांसाठी पोषक हवामान आहे. सकाळच्या वेळेस येणारे धुके, दुपारी असणारे ऊन आणि रात्रीच्या वेळेस थंडी यामुळे चिलटांचे प्रजनन वाढले आहे. जास्त प्रमाणात थंडी तसेच कडक ऊन पडले तर चिलटांची संख्या कमी होते. मात्र, सध्या हवामानात थंडी व ऊन मध्यम असल्याने चिलटांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण सर्वच ठिकाणी असल्याने चिलटांची संख्या जास्त झाली आहे. हिवाळ्याकडे संक्रमण होत असताना चिलटांची पैदास जास्त प्रमाणात होते. तेलकट, स्निग्ध पदार्थ, झाडे, पाने-फुले तसेच गटाराच्या ठिकाणी चिलटे जास्त प्रमाणात दिसून येतात. आता जर कडक ऊन पडले

तरच चिलटांची संख्या कमी होईल, असे याविषयी तज्ज्ञांचे मत आहे.

सर्वत्र मोठ्या संख्येने चिलटे उडत असल्याने दुचाकीस्वारांसाठी ते अपघाताला एकप्रकारे निमंत्रणच देतात. ज्या दुचाकीस्वारांनी चष्मा घातलेला नाही, अशांच्या डोळ्यांत चिलटे जात असल्याने अपघात होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. चिलटांचा उपद्रव वाढत असल्याने कित्येक दुचाकीस्वार गॉगल्स वापरतात. तर, काहीजण हेल्मेट वापरणे पसंत करत आहेत. चिलटे डोळ्यात गेल्याने काही दुचाकीस्वार एक हाताने वाहन चालवतात, तर दुसऱ्या हाताने डोळे चोळतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो.

चिलटांचे आयुष्य जास्तीत जास्त पाच दिवसांचे

सध्या चिलटांच्या प्रजननासाठी पोषक वातावरण असून चिलटे चार सर्कलमधून पुढे जात असतात. सुरवातीला ते अंडी घालतात. त्यानंतर अळी तयार होते. तिसरा टप्पा हा कोषाचा असतो. चौथ्या टप्प्यात पूर्णपणे प्रौढ चिलट तयार होऊन रस्त्यावर उडतात. पांढऱ्या व भुरकट रंगाचे चिलटे वनस्पतींवर जास्त असतात. ऊन कमी झाल्यावर संध्याकाळी हे चिलटे रस्त्यावर जास्त प्रमाणात उडतांना दिसतात. सध्या चिलटांसाठी कोषातून बाहेर पडण्यासाठी पोषक हवामान तयार झालेले आहे.

चिलटे डोळ्यात जाऊ नये म्हणून गॉगल वापरावा. डोळ्यात गेले असेल तर डोळा चोळू नये. पाण्याने डोळा धुऊन घ्या. त्रास जाणवत असेल तर मनाने औषधी घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

— डॉ. संतोष अग्रवाल, नेत्रतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com