लासूर स्टेशन : माळीवाडगाव ते सनव आणि माळीवाडगाव ते दिनवाडा या दोन रस्त्यांचे कोट्यवधी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले. मात्र, महिनाभरातच हे रस्ते अक्षरशः हाताने उखडता येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे..मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून माळीवाडगाव ते सनव तीन किलोमीटर रस्ता एक कोटी ९४ लाख ४८ हजार रुपये तर माळीवाडगाव ते दिनवाडा अडीच किलोमीटर रस्ता १.४४ कोटी ८५ हजार रूपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले. ही दोन्ही कामे छत्रपती संभाजीनगर येथील साईयशा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आली. मात्र, रस्त्यांची अवस्था हाताने उखडता येईल अशी झाली असून निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे..या रस्त्यांमुळे शेतकरी व प्रवासी सुखावले होते. पण महिनाभरातच झालेल्या दुरवस्थेने आशा मावळल्या आहेत. ग्रामस्थांनी यावर ग्रामसभेत ठराव घेत ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असून, रस्त्याचे काम नव्याने न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे..योजना नव्हे, भ्रष्टाचाराचे कुरणअभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून डागडुजी करावी लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सडक योजना चरण्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. दरम्यान, ओव्हरलोड वाहने रस्त्यावरून गेल्याने डांबरीकरण उखडल्याचा पत्रव्यवहार पीडब्लूडीच्या अभियंत्यांनी संबंधित विभागाला केला आहे..रस्त्यांचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकामाचे अभियंता आणि ठेकेदार कामावर आलेच नाही. रस्ता संगनमताने निष्कृष्ट दर्जाचा करून निधी लाटला आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष आहे. अवघ्या महिनाभरात रस्त्याची डागडुजी करण्याची नामुष्की ठेकेदारावर आली आहे.- डॉ. गणेश ठोंबरे, माजी सरपंच, दिनवाडा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.