दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ‘रूट झोन ड्रिप इरिगेशन टूल’ विकसित

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी  ‘रूट झोन ड्रिप इरिगेशन टूल’ विकसित
Published on: 
((अँकर)) ............................ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘रूट झोन ड्रिप इरिगेशन टूल’ प्रा. डॉ. कुणाल वनंजे यांच्या तंत्रज्ञानाला भारत सरकारचे पेटंट मंजूर सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ८ ः वारंवार पडणारा दुष्काळ आणि पाण्याची भीषण टंचाई यांचा सामना करणाऱ्या बळिराजासाठी नवीन विकसित संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल वनंजे यांनी विकसित केलेल्या ‘रूट झोन ड्रिप इरिगेशन टूल’ या अभिनव तंत्रज्ञानाला भारत सरकारतर्फे नुकतेच अधिकृत पेटंट मंजूर करण्यात आले आहे. ठिबक सिंचनातील पाण्याचा एकही थेंब वाया न घालवता थेट पिकांच्या मुळांपर्यंत पाणी पोचवणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे सुमारे ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होणार असून, दुष्काळग्रस्त भागातील शाश्वत शेतीसाठी हे उपकरण वरदान ठरणार आहे. ......... काय आहे हे अभिनव तंत्रज्ञान पारंपरिक ठिबक सिंचन पद्धतीत पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर पडते; ज्यामुळे कडक उन्हात बाष्पीभवन होऊन किंवा तणांमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. डॉ. वनंजे यांनी शोधलेले ‘रूट झोन ड्रिप इरिगेशन टूल’ या समस्येवर अत्यंत सोपा व प्रभावी उपाय शोधून काढते. जलसंवर्धन आणि सूक्ष्म सिंचन क्षेत्रात शाश्वत शेतीला दिशा देणाऱ्या या संशोधनाबद्दल आणि भारत सरकारचे पेटंट मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर, प्राध्यापकवर्ग, संशोधक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रा. डॉ. वनंजे यांचे अभिनंदन केले जात आहे. ................ ((पॉईंटर)) - थेट मुळांपर्यंत पोचणारे पाणी : हे उपकरण पारंपरिक ठिबक सिंचन प्रणालीलाच जोडून वापरता येते. या उपकरणाच्या साह्याने ठिबकचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर साचण्याऐवजी थेट पिकांच्या मुळांच्या मुख्य कार्यक्षम क्षेत्रात (रूट झोन) पोचवले जाते. - कमी खर्च अन् पुनर्वापर शक्य : हे उपकरण पूर्णपणे पर्यावरणपूरक, कमी खर्चाचे, सहज बसविता येणारे आणि दीर्घकाळ पुनर्वापर करता येण्याजोगे आहे. त्यामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांना ते सहज परवडणारे आहे. - पाण्याची प्रचंड बचत : एक एकरात ३० ते ४० हजार लिटर पाण्याची बचत होते. - मातीचा प्रकार, हवामान आणि पिकांच्या गरजेनुसार हे तंत्रज्ञान पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करते. ........ ((कोट)) कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात प्रत्येक थेंबाचा योग्य उपयोग ही काळाची गरज बनली आहे. पारंपरिक पिके तसेच फळबागांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जमिनीच्या आत मुळांच्या परिसरात दीर्घकाळ आर्द्रता टिकून राहत असल्याने पिकांची वाढ उत्तम होते आणि पाण्याचा अपव्यय टळतो. - प्रा. डाॅ. कुणाल वनंजे ............ धाराशिव ः विकसित केलेल्या ‘रूट झोन ड्रिप इरिगेशन टूल’सह प्रा. डाॅ. कुणाल वनंजे. (दुसऱ्या छायाचित्रात) केंद्र सरकारकडून मंजूर झालेले पेटंट. फोटो क्रमांक ःOSM26B07148, OSM26B07149

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com