

RTO Action
sakal
छत्रपती संभाजीनगर : देशात प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना परावर्तक (रिफ्लेक्टर) बसवणे मोटार वाहन कायद्याने बंधनकारक केले आहे. रिफ्लेक्टर नसलेली वाहने रस्त्यात अपघाताला कारणीभूत ठरतात, म्हणूनच आरटीओ कार्यालयाने गेल्यावर्षीच्या तुलतनेत थेट कारवायांचा धडाका सुरू केला. गेल्या आठ महिन्यांत रिफ्लेक्टर नसलेल्या २२४० वाहनांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. एवढ्यावरच न थांबता या सर्व वाहनांना रिफ्लेक्टर लावून घेण्यास भाग पाडले.