esakal | समाजवादी पार्टीला नकोय महाविकास आघाडी 

बोलून बातमी शोधा

समाजवादी पार्टीला नकोय महाविकास आघाडी 

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडी करण्याच्या चर्चा असताना समाजवादी पार्टी मात्र या आघाडीत जाण्यास इच्छुक नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने औरंगाबाद पूर्वची जागा समाजवादी पक्षाला सोडली होती. मात्र यामध्ये जागा सोडण्यावरून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये वाद होते.

समाजवादी पार्टीला नकोय महाविकास आघाडी 
sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबादः  राज्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष औरंगाबाद महापालिका स्वबळावर लढणार असून, त्यांना या निवडणुकीत महाविकास आघाडी नकोय. विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसकडून सहकार्य मिळाले नसल्याचा राग पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये असल्याने त्यांना आघाडी नकोय. सध्या त्यांच्याकडून ४५ ते ५० जागांसाठी तयारी केली जात आहे.

हेही वाचा- कारखान्यातील 85 टक्के अपघात चुकीच्या क्रीयांमुळेच

प्रमुख पक्षांसोबत समाजवादी पार्टीकडून महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. मुंबईतून अर्ज आल्यानंतर ते इच्छुकांना वाटप केले जाणार आहे. शिवाय स्टार प्रचारकसुद्धा प्रचारासाठी आणले जाणार आहे. ज्यांना प्रमुख पक्षाचे तिकीट मिळण्याची शक्यता धूसर आहे असे उमेदवार आतापासूनच समाजवादी पक्षाकडे तिकिटाची विचारणा करीत आहेत.

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी महाविकास आघाडी करण्याच्या चर्चा असताना समाजवादी पार्टी मात्र या आघाडीत जाण्यास इच्छुक नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने औरंगाबाद पूर्वची जागा समाजवादी पक्षाला सोडली होती. मात्र यामध्ये जागा सोडण्यावरून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये वाद होते.

हेही वाचा- पशुपालकांसाठी खुशखबर किसान क्रीडीट कार्डावर आता...

समाजवादी पक्षाचे कलीम कुरैशी मैदानात असताना काँग्रेसकडून अपक्ष असलेले युसूफ मुकाती यांना पाठिंबा देण्यात आला. समाजवादी पक्षाला पाठिंबा द्यावा की अपक्ष उमेदवाराला या संभ्रम अवस्थेत पक्षाचे कार्यकर्ते राहिले. या सर्वांमध्ये समाजवादी पक्षाचे कलीम कुरैशी यांना पाच हजार ५५५ मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला नाही. सहकार्य केले नाही. त्याचा राग समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये असल्याने आता महाविकास आघाडी नकोच असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

आमचे शहरातील ४५ ते ५० जागांवर लक्ष आहे. कोणत्या वॉर्डात उमेदवार द्यायचे हेसुद्धा निश्‍चित आहे. मात्र निवडणूक लढताना आम्ही ती स्वबळावर लढणार आहोत. मागील विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्वची जागा आमच्या पक्षाला सुटलेली असताना आमच्या विरोधात काम करण्यात आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आम्हाला महाविकास आघाडी नकोय. 
- मोहम्मद ताहेर (शहराध्यक्ष, समाजवादी पार्टी)