Sambhaji Nagar : ‘घाटी’त २४ तासांत १४ मृत्यू ; दोन बालकांचा समावेश, नऊ जणांना तपासून मृत घोषित

मराठवाड्यासह लगतच्या नगर, खानदेशातील धुळे, जळगाव, विदर्भातील बुलडाणा अशा बारा- चौदा जिल्ह्यांतील रुग्णांचा घाटी रुग्णालयावर भार आहे.
chh, sambhaji nagar
chh, sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाल्याची बाब मंगळवारी सकाळी समोर आली. यात दोन बालकांचा समावेश आहे. त्यात वेगवेगळे आजार, अत्यवस्थ, बाहेरच्या रुग्णालयांतून रेफर झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. औषधांअभावी असे घडलेले नाही, असे रुग्णालय प्रशासन सांगत असले तरी पुरेसा साठा नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे विकत आणावी लागतात, हे वास्तव पाहायला मिळते. यामुळे घाटी रुग्णालयासमोर दिवसेंदिवस औषध दुकानांची संख्या वाढताना दिसते.

२४ तासांत मृत्यू झालेल्यांत दोन बालके, १२ मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. १२ पैकी एक किडनी निकामी झाल्याने, दोघांचा हृदयविकाराने, उर्वरित नऊ जणांचा ‘घाटी’त नेतानाच मृत्यू झाला होता. तपासून त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मराठवाड्यासह लगतच्या नगर, खानदेशातील धुळे, जळगाव, विदर्भातील बुलडाणा अशा बारा- चौदा जिल्ह्यांतील रुग्णांचा घाटी रुग्णालयावर भार आहे. रुग्णाची प्रकृती हाताबाहेर गेली, उपचाराला प्रतिसाद देईनासा झाला की ‘घाटी’त न्या असे सांगितले जाते.

त्यामुळे अत्यवस्थ स्थितीतील रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक दिसते. मोठ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. हाफकीनकडून खरेदी करून औषधे पुरवली जाते. काही प्रमाणात स्थानिक स्तरावर खरेदीची परवानगी असते.

chh, sambhaji nagar
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

त्यालाही खूप मर्यादा असल्याचे सांगण्यात आले. पुरेसा निधी दिला जात नाही. मिळालाच तर खरेदी प्रक्रिया क्लिष्ट असल्याने ती पूर्ण होईपर्यंत पुढच्या वर्षीचे नियोजन येते. परिणामी रुग्णांच्या नातेवाइकांना औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन खासगी दुकानांवर जावे लागते. औषध खरेदी प्रक्रियेतील क्लिष्टता दूर झाल्याशिवाय औषधांची टंचाई दूर होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनाच स्ट्रेचर ढकलावे लागते, सलाईन धरुरून मागे पळावे लागत असल्याचे चित्र बघायला मिळते.

chh, sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : गुंडांकरवी बिल्डरची रो-हाऊसधारकांना बेदम मारहाण! काहींची फुटली डोकी; महिला, मुलांनाही सोडले नाही

घाटी’ची सद्यःस्थिती

खाटांची संख्या - ११७७

खाली गाद्या टाकून रोज उपचार घेणारे

१५०० ते २०००

रोज होणाऱ्या प्रसूती ५० ते ७०

रोज बाह्य रुग्ण तपासणी १५०० ते २०००

रोजची आंतररुग्ण भरती १५० ते २००

१२० प्रकारच्या औषधे लागतात,

निम्मीच उपलब्ध

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे

७४४, रिक्त पदे ३१०

महिन्याला ३०० ते ३५० मृत्यू

‘घाटी’त अतिगंभीर रुग्ण येतात. अनेक ठिकाणांहून शेवटच्या क्षणी रेफर केलेले असते. अपघातात मृत झालेले असतात. महिन्याला साधारणतः सरासरी ३०० ते ३५० मृत्यू होतात, असे वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. विकास राठोड यांनी सांगितले.

‘घाटी’ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सर्व सुविधा दिल्या जातात. रस्ते अपघात, सर्पदंश आदी विविध गंभीर स्थितीतील रुग्ण दाखल होतात. खासगी रुग्णालयांनी नाकारलेले, अत्यवस्थ रुग्णांनादेखील आरोग्यसेवा देतो. ‘घाटी’च्या रुग्णसेवेवर विश्वास असल्याने १४ जिल्ह्यांतील रुग्ण दाखल होतात. ‘घाटी’ची स्थिती चांगली असून ती आणखी चांगली ठेवण्याचा प्रयत्न असतो.

डॉ. संजय राठोड, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय

chh, sambhaji nagar
Nagpur News : दोन्ही रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा पुरेसा

औषधांचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासन सांगत असले तरी वस्तुस्थिती नाही. डाक्टर सर्रासपणे रुग्णांच्या नातेवाइकांना औषधाच्या चिठ्ठ्या लिहून देतात. रुग्णांच्या नातेवाइकांना भटकंती करावी लागले. त्यामुळेच''घाटी’मध्येच मुबलक औषध साठा उपलब्ध व्हायला हवा, एवढीच माफक अपेक्षा आहे.

प्रवीण शिंदे, अभ्यागत समिती सदस्य, ‘घाटी’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com