Sambhaji Nagar : जुलै महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात प्राथमिक शाळांमध्ये खडूंचा तुटवडा

विद्यार्थी संख्येवर आधारित हा निधी शाळांना पुरेना
Sambhaji Nagar
Sambhaji Nagar sakal

Sambhaji Nagar - सोयगावसह तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये खडूंचा तुटवडा आढळून येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना यापूर्वी मिळणारा चार टक्के सादिल निधी जिल्हा परिषदेने बंद करून नियमात बदल केला. शाळेच्या विद्यार्थी संख्येवर आधारित समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत इतर खर्चासाठी निधी दिला जातो.

यामध्ये कमीतकमी तीन हजार ते जास्तीत-जास्त आठ हजार इतका निधी शाळांना झाडू, खडू, कागद आणि इतर साहित्यासाठी दिला जातो. विद्यार्थी संख्येवर आधारित हा निधी शाळांना पुरेसा होतं नाही. त्यामुळे तालुक्यातील १२० जिल्हा परिषदेच्या शाळांना खडू खरेदीसाठी निधी अपूर्ण पडत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाकडे वळविण्यासाठी रंगीबेरंगी खडूंचा शिक्षणासाठी वापर करण्याचे धोरण अवलंबिले आहे. परंतु, समग्र शिक्षा अभियानात मिळणारा निधी तोकडा पडत असून रंगीबेरंगी खडूची बाजारात वाढीव किंमत आहे. त्यामुळे शाळांना खडू खरेदी करणे जिकरीचे झाले आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात सोयगाव तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये खडूचा तुटवडा भासत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com