Sambhaji nagar : झुलेलाल जयंतीनिमित्त शोभायात्रेने वेधले लक्ष Sambhaji nagar Jhulelal Jayanti procession attracts attention | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शोभायात्रेने वेधले लक्ष

Sambhaji nagar : झुलेलाल जयंतीनिमित्त शोभायात्रेने वेधले लक्ष

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिंधी समाजाच्यावतीने गुरुवारी (ता.२३) भगवान झुलेलाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहागंज येथून सायंकाळी काढलेल्या मिरवणुकीत जन्माचा भव्य देखावा,

ढोल पथकाच्या सादरीकरणाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. युवक संघटनेच्यावतीने सकाळी काढण्यात आलेल्या वाहन रॅलीत लाल फेटा, पांढरा सदरा व ‘जय झुलेलाल’ नावाचे झेंडे हाती घेत समाज बांधवांनी ‘आयोलाल’ ‘जय झुलेलाल’ अशा घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने सिंधी समाज बांधवांची उपस्थिती होती.

सिंधी सेवा मंडळाच्यावतीने सिंधी कॉलनीतील कंवरराम धाम येथे सकाळी सहा वाजता भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेला पंचामृत स्नान घालण्यात आले. सायंकाळी ६ वाजता शहागंज येथून मिरवणुकीला सुरवात करण्यापूर्वी आरती करण्यात आली.

ही आरती कल्याणदास माटरा, भरत निहलानी, राजू तनवाणी, राजू लक्ष्मणदास परसवाणी, आकाश आहुजा, आनंद दयालानी आदींच्या हस्ते करण्यात आली. या मिरवणुकीत सजविलेला रथ होता. या फेरीमध्ये युवक-युवतींच्या झुलेलाल ढोल पथकाने सादरीकरण केले. एका वाहनावर

‘अक्षोभ्य’ देखावा व भगवान झुलेलाल यांचा जन्म देखाव्याचे चित्र उभे करण्यात आले. ही मिरवणूक शहागंज, संस्थान गणपती, जाफर गेट, मोंढा नाकामार्गे सिंधी कॉलनी येथील सिंधी भवन येथे आली, येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

पुरुषोत्तम इसराणी, सेवकराम तोलवाणी, विनोद चोटलाणी, शंकर बजाज, शिव तोलवाणी, बाबुभाई कारिया, राजा रामचंदानी, अजय तलरेजा, विनोद गुरनानी, राकेश काल्डा, मेहूल बजाज, राहुल बजाज, साहिल रामचंदानी, मनीष फेरवानी, राहुल फेरवानी, भावेश मनकानी, अनिष बजाज, रितेश चावला,

अनुप तोलवाणी आदींची उपस्थिती होती. दरम्यान मिरवणुकीपूर्वी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात वाहन फेरीसह विविध धार्मिक कार्यक्रम सिंधी भवन येथे घेण्यात आले. सिंधी समाज मिरवणुकीत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचाही सहभाग होता.