
Sambhaji nagar : प्रेम...ब्रेकअप...अन् विनयभंग!
छत्रपती संभाजीनगर : ‘तो’ २२ वर्षांचा तर ‘ती’ २४ वर्षांची. ती ‘त्याच्या’सोबत रिलेशनशीपमध्ये राहिली. कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले खरे, मात्र त्यानंतरही तो तिचा पाठलाग करु लागला. इतकेच नव्हे, तर त्याने तिच्या नावाने स्नॅपचॅटवर बनावट खाते काढले अन् तिच्या मैत्रिणीला रिक्वेस्ट पाठवत त्याने रिलेशनशिपमध्ये असताना
तीने टॅंक टॉप घालून दोघांनी काढलेला तिचा अश्लील फोटो पाठवून विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सूरज चंद्रवदन शहा (२२, रा. राजाबाजार परिसर) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील २४ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती सध्या सातारा परिसरात राहून शिक्षण घेते. तरुणी आणि आरोपी सुरज दोघे एकमेकांसोबत काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिले. कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र फेब्रुवारी महिन्यांपासून सुरज तिच्यासोबत मैत्री करण्यासाठी तिचा पाठलाग करत असे.
दरम्यान त्याने स्नॅपचॅटवर तिच्या नावाने बनावट खाते काढले. त्या खात्यावर स्टोरी तयार करुन तरुणीच्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. इतकेच नव्हे, तर दोघे रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी सुरज बाजूला बसलेला असतानाचा टॅंक टॉप घालून काढलेला अश्लील फोटो पाठवून तरुणीची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावरुन तरुणीने बदनामी, विनयभंग झाल्याची फिर्याद सातारा पोलिसांत दिली. यावरुन उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी सुरज शहा याच्याविरोधात विनयभंगासह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास स्वतः पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार करीत आहेत.