Sambhaji nagar : किराडपुरा दंगलीतील दोघांना तुरुंगाची हवा

पोलिसांनी आरोपींना न्‍यायालयीन कोठडीत पाठविण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली होती
 अटक
अटकsakal

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी दोन आरोपींच्‍या विशेष तपास पथकाने सोमवारी (ता. ३) रात्री मुसक्या आवळल्या. दोन्‍ही आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, पोलिसांनी आरोपींना न्‍यायालयीन कोठडीत पाठविण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली होती.

विनंती मान्‍य करुन प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी जी. डी. गुरनुले यांनी दोन्‍ही आरोपींची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली. शेख अश्‍पाक शेख मुसा (३०) आणि शेख जावेद शेख कलीम (२९, रा. शहागंज) अशी आरोपींची नावे आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरुणांच्या दोन गटात गुरुवारी मध्यरात्री दीड ते साडेतीन दरम्यान दंगल होऊन दगडफेक, जाळपोळ करण्यात आली होती. याचे रूपांतर दगडफेक आणि हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता.

या दंगलीनंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत श्रीराम नवमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडला होता. प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गुन्‍ह्यात आतापर्यंत ४३ दंगेखोरांना पोलिसांनी अटक करुन न्‍यायालयात हजर केले आहे. त्‍यातील १४ जणांची पोलीस कोठडी नंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे. तर २९ आरोपी हे अद्यापही पोलीस कोठडीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com