Sambhaji nagar : तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक

महापालिका प्रशासकांकडे सादर करावे लागणार प्रमाणपत्र
 स्ट्रक्चरल ऑडिट
स्ट्रक्चरल ऑडिटsakal

छत्रपती संभाजीनगर : शहरातील तीस वर्षे किंवा त्यापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आता बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिकेने आदेश काढले असून, बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र थेट आयुक्तांकडे सादर करण्याचे आवाहन मालमत्ताधारकांना करण्यात आले आहे.

 स्ट्रक्चरल ऑडिट
Crime news: अल्पवयीन मुलीवर मुंबईला नेऊन अत्याचार करणाऱ्यास आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाने आदेश काढले आहेत. त्यात नमूद करण्यात आले आहे की, इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र दिल्यापासून किंवा इमारतीच्या बांधकाम क्षेत्राच्या किमान पन्नास टक्के क्षेत्राचा भोगवटा केल्याच्या दिनांकापासून ज्या इमारतीचा तीस वर्षांचा कालावधी संपला असेल अशा इमारतीच्या मालक किंवा भोगवटाधारकांनी ‘इमारत मानवी वस्तीसाठी योग्य आहे’

 स्ट्रक्चरल ऑडिट
Crime news : लग्न झाल्यानंतर महिनाभरातच सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

असे प्रमाणित करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम अभियंत्याकडून (स्ट्रक्चरल इंजिनिअर) अशा बांधकामाची तपासणी करून घेऊन बांधकाम अभियंत्याने दिलेले ‘बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र’ महापालिका आयुक्तांकडे सादर करावे. हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

सहा महिन्यात दुरुस्ती आवश्‍यक

बांधकाम अभियंत्याच्या अहवालाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत बांधकामातील त्रुटी किंवा दोष दूर करणे संबंधित इमारत मालकाला किंवा भोगवटाधारकांना बंधनकारक असेल. यासंदर्भात दखल न घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com