Sambhaji nagar : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या स्वीय सहायकाला ६० हजारांची लाच घेताना

महापालिका प्रशासनाने चुप्पी साधल्याने आश्‍चर्य
bribe
bribesakal

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या स्वीय सहायकाला ६० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांसह इतर विभागात तुंबलेल्या फायली मार्गी लागत आहेत. त्यात शंभरपेक्षा जास्त फायलींचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात महापालिका प्रशासनाने साधी चौकशीही केली नाही! यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

लाच मागणारा अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक मनोज मारवाडी याला चार दिवसांपूर्वी अटक केली. या प्रकरणानंतर महापालिकेत खळबळ उडाली. त्यामुळे प्रत्येक विभागप्रमुख सावध होत प्रलंबित फायली मार्गी लावत आहेत. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात प्रलंबित असलेल्या शंभरपेक्षा जास्त बिलांच्या फायली तातडीने वेगवेगळ्या विभागांकडे पाठविण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले की, माझ्याकडे कोणतीही फाइल दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहत नाही. फायली प्रलंबित ठेवण्याचे कारणही नाही. काही फायलींवर आपण जाणीवपूर्वक चर्चा, स्थळपाहणी लिहिता असा आरोप होतोय, असे विचारले असता ते म्हणाले की, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. काही ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com