Sambhaji Nagar News : जनतेचे पाणी पाणी अन् राजकारण्यांचा श्रेयवाद!

योजनेची अवस्था ‘एक गाव बारा भानगडी’ तरी आढाव्याचा सपाटा
water reduction
water reductionesakal

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठा योजनेची अवस्था ‘एक गाव बारा भानगडी’ अशी झाली आहे. उन्हाळ्यामुळे पाणी पुरवठा सुधारण्यासाठी महापालिका अधिकारी कसरत करत असताना दुसरीकडे भाजप व शिवसेनेत श्रेयाचे राजकारण पेटले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या दोन मंत्र्यांनी शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला.

त्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे गुरुवारी (ता. १३) स्मार्ट सिटी कार्यालयात दाखल होत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. एकीकडे राजकारण्यांमध्ये श्रेयवाद सुरू असताना शहरातील अनेक भागात तब्बल आठ दिवसानंतर नळांना पाणी येत असल्याने नागरिकांवर मात्र पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे.

उन्हाळा सुरू होताच दरवर्षी शहरात पाणीबाणी निर्माण होते. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी विरोधीपक्षनेते असताना शहरात येऊन आक्रोश मोर्चा काढला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी धारेवर धरले होते. दरम्यान राज्यात सत्ताबदल झाला

व श्री. ठाकरे यांनी शहरातील जनतेला तातडीने दिलासा मिळावा म्हणून मंजूर केलेल्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनाची निविदा अद्याप मंजूर होऊ शकली नाही. त्यात आता शहराच्या पाणी योजनेचे श्रेय घेण्यावरून भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटात स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड व राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी पाणी पुरवठ्यासह शहरातील विविध विकास योजनेचा दोनच दिवसांपूर्वी आढावा घेतला.

या बैठकांना शिवसेनेचे (शिंदे गट) लोकप्रतिनिधी नव्हते. त्यानंतर गुरुवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची आढावा बैठक पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घेतली. या बैठकीला आमदार प्रदीप जैस्वाल यांची उपस्थिती होती पण भाजपचे लोकप्रतिनिधी नव्हते.

शहराच्या अनेक भागात सध्या आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. वारंवार तांत्रिक बिघाड येत असताना त्यातून मार्ग काढताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर दुसरीकडे मंत्र्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना तासन् तास अडकून पडावे लागत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीला महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर. एस. लोलापोड यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पुनरुज्जीवन कामाच्या निविदांचे काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्री. भुमरे यांनी ७०० मिलिमिटर व्यासाच्या योजनेच्या पुनरुज्जीवन कामाच्या निविदेचे काय झाले? अशी विचारणा या बैठकीत जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली. तीन निविदांना प्रतिसाद मिळाला असून, उर्वरित कामांच्या नव्याने निविदा काढण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com