संभाजीनगर-नगर रेल्वेमार्गाला पावणेतीन कोटी; मंत्रालयाने स्वीकारला नवीन मार्गाचा प्रकल्प आराखडा

छत्रपती संभाजीनगर ते नगर रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) रेल्वे मंत्रालयाने स्वीकारला.
संभाजीनगर-नगर रेल्वेमार्गाला पावणेतीन कोटी
संभाजीनगर-नगर रेल्वेमार्गाला पावणेतीन कोटीSakal

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते नगर रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) रेल्वे मंत्रालयाने स्वीकारला. त्यासाठी दोन कोटी ७० लाख रुपये मंजूर केले, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर ते नगर रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी अनेक दिवसांपासून मराठवाडा रेल्‍वे कृती समिती आणि विविध संघटना पाठपुरावा करीत होत्या. छत्रपती संभाजीनगर ते नगर रेल्वेमार्ग झाल्यास नगर आणि पुढे गोवा जाण्यासाठीची कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.

या संदर्भात मराठवाडा रेल्वे कृती समितीच्या वतीने डॉ. कराड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मागणीचे निवेदन दिले होते. या रेल्वे मार्गासाठी पूर्वी सर्वे झालेला आहे. त्या आधारावर डीपीआर मंजूर केला असल्याचे पत्र रेल्वेमंत्र्यांनी डॉ. कराड यांना पाठवले. या नवीन रेल्वेमार्गासाठी २ कोटी ७० लाख रुपये मंजूर केले.

रोज आठ ते दहा हजार प्रवासी

छत्रपती संभाजीनगर ते नगर, पुणे मार्गावर एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकातून प्रत्येक पंधरा मिनिटाला बस उपलब्ध आहे. याशिवाय नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड येथून पुण्यासाठी सुटणाऱ्या आणि विदर्भाच्या विविध शहरांतून पुण्यासाठी जाणाऱ्या सर्व बस छत्रपती संभाजीनगर मार्गे धावतात.

या सर्व बसचा आकडा हा तीनशेच्या जवळपास आहे. याशिवाय विविध शहरातून धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसही दोनशे पेक्षा अधिक आहेत. या व्यतिरिक्त १०० च्या जवळपास कॅब आणि शेअरिंग कार या मार्गावर धावतात. या मार्गावर आठ ते दहा हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्यानेच पुणे रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com