Sambhajinagar : ‘खायला काळ अन् भुईला भार’ टायपिंग न येणाऱ्या लिपिकाला ४५ हजार पगार कसा द्यायचा?

महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांची ‘खायला काळ अन् भुईला भार’ अशी अवस्था आहे.
टायपिंग
टायपिंग sakal

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांची ‘खायला काळ अन् भुईला भार’ अशी अवस्था आहे. कोणत्याही विभागात बदली करा, अनेकांना कामच जमत नाही. महापालिका मात्र त्यांच्या वेतनावर वर्षाला लाखो रुपये खर्च करते. शुक्रवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी शिक्षण विभागातील लिपिकांना टायपिंग करून दाखविण्याचे आदेश दिले, पण तीनपैकी एका महिला लिपिकाला टाइप करता आले. त्यावर संतप्त झालेल्या प्रशासकांनी तुमच्यावर महिन्याला ४५ हजारांचे वेतन कशाला खर्च करायचे, असा प्रश्‍न केला.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी महापालिकेतील विविध विभागांना शुक्रवारी भेटी दिल्या. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे सध्या नूतनीकरण सुरू असून, हे काम पाहण्यासाठी जी. श्रीकांत गेले; पण सभागृहाला कुलूप असल्याने त्यांनी आपला मोर्चा विविध विभागांकडे वळविला. डीपी युनिटसाठी दिलेल्या कार्यालयापासून त्यांनी सुरवात केली. त्यानंतर ते विधी सल्लागार, आस्थापना, एनयूएलएम, कामगार व शेवटी शिक्षण विभागात पाहणी केली. शिक्षण विभागात काही महिला कर्मचारी बसलेल्या होत्या. त्यांनी यातील लिपिक कोण कोण आहेत? अशी विचारणा केली. तीन महिलांनी आम्ही लिपिक असल्याचे सांगितले.

त्यांच्या सोबत एक कंत्राटी कर्मचारी होता. तो संगणकावर काम करत होता. त्याला बाजूला करून जी. श्रीकांत यांनी महिला कर्मचाऱ्यांना टायपिंग करून दाखविण्यास सांगितले. एका महिलेने मी खूप घाबरले आहे, असे कारण दिले. दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याने मी टायपिंग शिकत आहे, असे उत्तर दिले. एका महिला कर्मचाऱ्याने मात्र टायपिंग करून दाखविली.

टायपिंग
Nana Patole : राज्यात सुलतानी सरकार; अन्नदाता शेतकऱ्यावर पुन्हा संकटाचे सावट - नाना पटोले

त्यावर ज्या कर्मचाऱ्यांना टायपिंग येत नव्हती त्यांना उद्देशून जी. श्रीकांत यांनी तुम्हाला वेतन किती मिळते अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी चाळीस ते ४५ हजारांचा आकडा सांगितला. टायपिंगच येत नसेल तर तुम्हाला एवढा पगार कशासाठी द्यायचा? असा प्रश्‍न केला. दरम्यान जी. श्रीकांत यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ॲपमध्ये माहिती भरून देण्याची सूचना केली आहे.

टायपिंग
Crime news : बाल्कनीतल्या खिडकीतलं प्रेम; आईसमोरून अल्पवयीन मुलीला पळवत गाठलं गाव पण...

कायमपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्याला जास्त काम

यावेळी कंत्राटी कर्मचाऱ्याला जी. श्रीकांत यांनी वेतन विचारले असता, त्याने नऊ हजार ५०० रुपये मिळतात, असे सांगितले. अनेक विभागांत कायम कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच जास्तीचे काम असल्याचे चित्र आहे. वेतन मात्र कायम कर्मचाऱ्याचे चार ते पाच पटीने जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com