Sambhaji Nagar : संभाजीनगर महापालिकेने शहरात सीबीएसई शाळा सुरू करून त्यासाठी महापालिकेतील तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती

‘सीबीएसई’ शाळेला मिळाले हक्काचे १७ कंत्राटी शिक्षक
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहरात सीबीएसई शाळा सुरू करून त्यासाठी महापालिकेतील तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र प्रशासक जी. श्रीकांत यांनी पालिका शाळेचे शिक्षक त्या-त्या शाळांना परत देऊन कंत्राटी पद्धतीने १७ शिक्षक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या शिक्षकांना मंगळवारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

महापालिकेने शहरात सहा ठिकाणी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या सहा शाळा सुरू केल्या आहेत. त्यानंतर महापालिका शाळेतील ज्या शिक्षकांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे, अशा शिक्षकांची निवड करून त्यांना सीबीएसई शाळेवर पाठविण्यात आले.

त्यामुळे महापालिका शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला. त्यानंतर प्रशासकांनी त्या शिक्षकांना पुन्हा मूळ शाळेत परत पाठविण्याचा निर्णय घेत सीबीएसई शाळेसाठी स्वतंत्र कंत्राटी शिक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली. ३०० उमेदवारांमधून १७ जणांची निवड झाली.

नवीन शिक्षकांना मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात भुमरे यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, प्रशासक जी. श्रीकांत, शहरअभियंता ए. बी. देशमुख, शिक्षणाधिकारी भरत तीनगोटे, समग्र शिक्षा अभियानचे ज्ञानदेव सांगळे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com