HSC Exam : विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला घेतली जाणार प्रेरणा परीक्षा

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जारी केले वेळापत्रक
HSC Exam
HSC Examesakal

छत्रपती संभाजीनगर - राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या वार्षिक परीक्षेचा विद्यार्थ्यांना सराव व्हावा, यासाठी शिक्षण विभागाकडून यंदा देखील बारावीची दर महिन्याला प्रेरणा परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून संभाव्य वेळापत्रक व नियमावली जारी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयात यावे, त्यांची बोर्ड परीक्षांची देखील तयारी व्हावी, या हेतूने माध्यमिक शिक्षण विभागाने सराव परीक्षा घेतल्या होत्या. याचा विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला मोठा फायदा झाला होता.

HSC Exam
Sambhaji Nagar : पोलिसांसाठी जास्तीचा निधी देऊ ; संदीपान भुमरे

या उपक्रमांचे सकारात्मक परिणाम पाहता यंदा देखील शिक्षण विभागाने बारावीसाठी विद्यार्थी प्रेरणा परीक्षा घेण्याचे नियोजन शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. या विद्यार्थी प्रेरणा परीक्षेला राज्य मंडळाशी संलग्नित सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभागी अनिवार्य करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी एक परीक्षा समिती, एक प्रश्नपत्रिका निर्मिती समिती गठीत करण्यात आली आहे.

HSC Exam
Chatrapati Sambhaji Nagar : विद्यार्थ्यांना दिवाळीत मिळणार २० दिवस सुटी

संभाव्य वेळापत्रक

  • ७, ८, ९ सप्टेंबर : प्रथम घटक चाचणी

  • ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर : प्रथम सत्र सराव परीक्षा

  • ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर : द्वितीय घटक चाचणी

  • २६ डिसेंबर ते १ जानेवारी : प्रथम सराव परीक्षा

  • २२ ते २९ जानेवारी : द्वितीय सराव परीक्षा

HSC Exam
Chh. Sambhaji Nagar News : मागील वर्षाचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार तरी कधी?

परीक्षेबाबत सूचना

  • सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळापत्रकानुसार सराव चाचणी परीक्षेचे नियोजन करावे.

  • परीक्षेस उपस्थित, अनुपस्थित विद्यार्थ्यांची यादी तयार करावी.

  • परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तर पत्रिका तपासून आवश्यक मार्गदर्शन करावे.

  • बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात अंतर्गत मूल्यमापन तसेच प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणदान करताना सराव परीक्षांची उपस्थिती विचारात घ्यावी.

  • सराव चाचणी परीक्षा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचे त्यांचे गुण लगेच कळविण्यात यावेत.

  • यापैकी दोन्ही चाचणी परीक्षा व एक सराव परीक्षा ही पुस्तकासह तसेच संबंधित विषय शिक्षकाच्या उपस्थितीत घेण्यास हरकत नाही. मात्र, अशा परीस्थितीत शंभर टक्के प्रश्नपत्रिका सोडवून घेणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com