Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर भरदिवसा थरार! पिस्तूल अन् चाकूचा धाक दाखवत अभियंत्याला लुटले; इनोव्हा कारसह ३० हजारांची रोकड पळवली

Engineer Robbed at Gunpoint on Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील आमणे टोल नाक्याजवळ भरदिवसा पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून सरकारी अभियंत्याला लुटले; इनोव्हा कार, मोबाईल आणि ३० हजारांची रोकड पळवली, दोघे संशयित ताब्यात.
Masked robbers allegedly threaten a government engineer with a pistol and knife and steal his Innova car and cash near Amane Toll Plaza on Samruddhi Expressway

Masked robbers allegedly threaten a government engineer with a pistol and knife and steal his Innova car and cash near Amane Toll Plaza on Samruddhi Expressway

esakal

Updated on: 

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर भरदिवसा एका सरकारी अभियंत्याला पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमणे टोल नाक्याजवळ घडलेल्या या प्रकारात हल्लेखोरांनी अभियंत्याची इनोव्हा कार, सुमारे ३० हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...