

Sanjay Shirsat & Eknath Shinde maharashtra politics
esakal
Sanjay Shirsat Abhijit Dipke Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट अडचणीत आल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या भूमिकेविरोधात जाऊन त्यांनी ही भेट घेतल्याचा आक्षेप आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या मंत्रिपदाबाबतही चर्चा रंगल्या आहेत.