Municipal officials promise additional water tankers to address the shortage in Satara-Devlai.
esakal
छत्रपती संभाजीनगर: सातारा-देवळाईकरांच्या पाणीटंचाईवर तात्पुरता दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासनाने टँकरची संख्या २२ वरून ४० करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत वाढीव टँकर सुरू करण्यात येणार असून, दुसरीकडे पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिनीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी (ता. दोन) महापालिकेच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर नळजोडणीच्या कामाला गती दिली जाईल, अशी ग्वाही महापौर समीर राजूरकर यांनी दिली. त्यामुळे वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सातारा-देवळाईकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.