Zilla Parishad Elections: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट, गणांच्या आरक्षणाला मंजुरी
chhatrapati sambhajinagar: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ८ जिल्हा परिषदेचे गट आणि १७ पंचायत समितीचे गण अनुसूचित जातीसाठी, तर काही गट-जमाती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कालावधीसंदर्भात आदेश पारित केल्यानंतर शासन स्तरावर यासाठी जलदगतीने पावले उचलण्यात येत आहेत.