

Chhatrapati Sambhajinagar Kunbi Entry Forgery Case School Register Tampered During Holidays
Esakal
गंगापूर, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळा सोडल्याच्या दाखला रजिस्टरमध्ये खाडाखोड करून ‘कुणबी’ अशी नोंद केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश हरिभाऊ नजन (वय ३९) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार, दिवाळीच्या सुट्या संपून ३ नोव्हेंबरला शाळा उघडण्यात आली. यावेळी वर्गखोलीचे कुलूप तोडल्याचे आढळले.