

Sugarcane labor rescue operation in Beed district
sakal
किल्लेधारूर : धारूर तालुक्यातील एका व्यक्तीने उत्तर प्रदेशातील मजुरांना ऊसतोड मजूर म्हणून आणून त्यांना कोणताही मोबदला न देता, मारहाण व धमकी देत डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले व धारूरचे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे यांनी बुधवारी सायंकाळी कारवाई करून १५ मजुरांची सुटका केली. संबंधित व्यक्तीविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.