Sambhaji Nagar News : नायलॉन मांजाची विक्री महागत पडू शकते ; पाच वर्षे सजा!

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पूर्वी फक्त भारतीय दंड विधान कलम १८८ लावण्यात येत होते. मात्र, हे कलम परिणामकारक ठरत नसल्याने आता प्रशासन पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ देखील लावले जात आहे.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या मनाई असताना सर्रास नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. पोलिस प्रशासन आणि मनपाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत गुन्हे दाखल करताना पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे कलमही लावण्यात येत आहे. हा अधिनियमानुसार पाच वर्षे शिक्षेची आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद असून गुन्हा सिद्ध झाल्यास हे कलम विक्रेत्यांना महाग पडू शकते. परंतु, शहरातील विक्रेत्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पूर्वी फक्त भारतीय दंड विधान कलम १८८ लावण्यात येत होते. मात्र, हे कलम परिणामकारक ठरत नसल्याने आता प्रशासन पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ देखील लावले जात आहे.

जो कोणी या अधिनियमाच्या किंवा त्याखाली काढलेल्या आदेशांचे उल्लंघन करील त्याला या उल्लंघनाबद्दल पाच वर्षांपर्यंतच्या मुदतीचा कारावास किंवा एक लाख रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा देण्यात येतील. पहिल्या उल्लंघनाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतरदेखील आरोपी पुन्हा गुन्हा करत असेल तर त्याला दिवसनिहाय दररोज पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याच कायद्याअंतर्गत पोटकलमानुसार आरोपी एक वर्षाच्या कालावधीनंतर याच स्वरूपाचा गुन्हा करत असेल तर सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

पुन्हा पाच विक्रेत्यांवर गुन्हे

पोलिस प्रशासनाकडून सातत्याने यासंदर्भात कारवाईची मोहीम सुरू आहे. बुधवारी पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत पाच विक्रेत्यांना अटक करीत ३३ हजार रुपयांचा नॉयलॉन मांजा जप्त केला. यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने पदमपुरा भागात नायलॉन मांजा विक्री करणारा आरोपी रोहित नरेंद्र कुमावत याला अटक करीत ६५ गट्टू जप्त केले. २७ हजार रुपयांचा हा मांजा आहे. तसेच सातारा, सिडको, पुंडलिकनगर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत सोळा नॉयलॉन मांजाचे गट्टू जप्त केले. यामध्ये आरोपी बाबासाहेब ढोले (रा. सातारा परिसर), कैलास माळी (रा. रायगडनगर), राहुल औटी (रा. एम २), बाळू वाळेकर (रा. मल्हार चौक) यांना अटक केली. आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. पोलिस यावर कडक कारवाई करीत आहेत. विक्रेत्यांनी हा मांजा विक्रीसाठी ठेऊ नये तसेच याचा वापर देखील नागरिकांनी करु नये.

— मनोज लोहिया, पोलिस आयुक्त

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करीत आहेत. मात्र, त्यांनी मूळ या मांजाचे उत्पादन करणाऱ्या मंडळींवर कारवाई करणे अपेक्षित आहे. तसेच या मांजाचा वापर करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली पाहिजे.

— किशोर पाठक,

मानद वन्यजीवरक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com