
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील संवर्ग-१ मधील शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी विशेष कारणांवर आधारित एकूण १,४८६ अर्ज सादर केले आहेत. या अर्जांतून शिक्षकांना वैयक्तिक, कौटुंबिक तसेच वैद्यकीय अडचणी मोठ्या प्रमाणावर भेडसावत असल्याचे समोर आले आहे. काही अर्ज हे शिक्षक स्वतः आजारी असल्यामुळे, तर काही प्रकरणे त्यांच्या जोडीदारांच्या गंभीर आजाराशी संबंधित आहेत.